24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeउस्मानाबादस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त पोलिसांची मॅरेथॉन स्पर्धा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त पोलिसांची मॅरेथॉन स्पर्धा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पोलिसांच्या वतीने रविवारी दि. १४ ऑगस्ट रोजी १० किमी मॅरेथॉन दौड स्पर्धा घेण्यात आली.
भारत देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, कॉलेज यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पोलिस विभागाच्या वतीने आयोजित मॅरेथॉन दौडचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अमृत महोत्वसी दौडची सुरुवात तुळजाभवानी स्टेडीयम येथून करण्यात आली.

सदर दौडेचा मार्ग तुळजाभवानी स्टेडीयम- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- पोलीस अधीक्षक कार्यालय- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत- ज्ञानेश्वर मंदीर- तेरणा कॉलेज समोरील चौक येथून परत त्याच मार्गे तुळजाभवानी स्टेडीयम येथे दौडेचा समारोप झाला.

अमृत महोत्सवी दौडेत उस्मानाबाद पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासह शहरातील नागरीक, विद्यार्थी तसेच स्पर्धा परिक्षा अकॅडमीच्या तरुण, तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या दौडेत पोलीस दलातील सचिन दराडे, रामहरी चाटे, रामराव इंगळे, अनघा गोडगे, गिता चौपाडे, कल्पना करणवाड, तसेच नागरीकांत रोहीत घरबुडवे, अनिकेत पवार, अर्जुन शिंदे, किर्ती कांबळे, सपना जाधव, पल्लवी लंगडे, आणि बाल गटात ऋषिकेश गंगावणे, साईनाथ माने, समर्थ माने यांचा प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आला. विजेत्यांना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या