24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeउस्मानाबादपरंड्यात नोटीस न देताच वीज पुरवठा खंडीत मोहिम सुरु

परंड्यात नोटीस न देताच वीज पुरवठा खंडीत मोहिम सुरु

एकमत ऑनलाईन

परंडा (प्रशांत मिश्रा) : ग्राहकांना भरमसाठ वीज बिल येत असल्याने तक्रारी करूनही ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही व काहीना तर ही बिले भरावीच लागतील असे सांगितले आहे. वीज ग्राहकांना चुकीचे रीqडग, वाढीव स्वरूपात विजेची बिले व जलदगतीचे वीज मीटर या विविध समस्यांना वीज ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. या दरम्यान थकबाकी असल्याने विद्युत महावितरण कंपनी कार्यालय कर्मचा-यांच्या वतीने अचानक सुरू करण्यात आलेल्या मोहीममध्ये ग्राहकांना पूर्व सूचना अथवा नोटीस न देता घरगुती सह व्यापा-यांचा विज पुरवठा खंडित करण्यात येत असल्याने ग्राहकांत संतापाची लाट पसरली आहे.

ऐन सणासुदीच्या काळात ग्राहक आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून विज बिल दुरुस्तीसाठी कार्यालयाकडे जातात मात्र त्या ठिकाणी संबंधीत कर्मचारी उपस्थित नसतात व तक्रारी अर्ज झेरॉक्स दुकानातून घेऊन येण्यास सांगितले जाते. त्यानंतर त्यावर अभियंता यांच्या स्वाक्षरी घेऊन तक्रारी अर्ज कार्यालयात जमा करावा लागतो. संबंधितांकडून या वेळी आलेले बिल भरा पुढील महिन्यात येणा-या वीज बिलात दुरुस्ती होईल असे सांगीतले जाते. मात्र पुढील महिन्यात ग्राहकांना वीज बिल वाढीवच येते, अशी फसवणूक होत असल्याचे ग्राहकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात.

विज बिल दुरुस्तीसाठी अर्ज केला असला तरी या संबंधित वीज कर्मचाèयांना सर्व माहित असूनही कोणतीही विचारपूस न करता वीज पुरवठा खंडित करण्यात येतो.अनेक वेळा नादुरुस्त मिटर, चुकीच्या रिडींग व वाढीव भरमसाठ वीज बिले अशा अनेक अडचणी येत आसुन याबाबत लेखी तक्रारी केल्या जातात. परंतु विचारपूस न करता मुदती नंतर काही दिवसात विजपुरवठा खंडीत ची कार्यवाही करतात, त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या दरम्यान वीज चोरांवर मात्र महावितरण कंपनी कारवाई करताना दिसत नाही. काही भागात अनेक ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी केल्याच्या बाबी समोर आल्या असतानाही संबंधित अधिका-याचे व कर्मचा-याचे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. विजेचे मीटर बंद असल्याच्या लेखी तक्रारी करून अनेक महिने याची दखल घेतली जात नाही, मीटर बदलून झाल्यावर त्याचा तपासणी अहवाल ग्राहकांना दिला जात नाही तसेच चुकीच्या रीqडगचा हा त्रास मागील पाच ते सहा महिन्यांपासून जास्तच जाणवत असल्याचे ग्राहकांमध्ये बोलले जात आहे.

कोरोना काळात देखील चुकीचे व अंदाजे भरमसाठ वीज बिल आल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या मात्र याकडे महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांनी दुर्लक्ष केल्याने ग्राहक वैतागले आहेत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असल्या तरीही हा प्रश्न कायम आहे. वरिष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मागील काही महिन्यांपासून विज ग्राहकांच्या वापरापेक्षा भरमसाठ जास्तीचे वीज बिल मिळत असल्याने काही वीज ग्राहक जिल्हा ग्राहक तक्रार न्याय मंच न्यायासाठी धाव घेत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, वीज बिलामधे दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी केली तरी देखील त्यात कोणताही बदल होत नसल्याचे महावितरण कंपनी कडून सांगण्यात येत असल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास करण्याची पाळी आलेली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या