23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeउस्मानाबादमान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

एकमत ऑनलाईन

मोहा : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर आता राज्याला वरुणराजाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. जून महिन्यात ५ ते ७ तारखेपर्यंत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनाची वर्दी देणारा पूर्वमोसमी पाऊस राज्यात बरसायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये सध्या वादळी वा-यांसह पाऊस पडत आहे. हवामान खात्याने यासंदर्भात इशारा दिला होता. हा इशारा आता खरा ठरताना दिसत आहे. मात्र, यामुळे शेतीमाल आणि आंब्याचे नुकसान होताना दिसत आहे.

कळंब तालुक्यातील मोहा परिसरात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी (दि.२०) रोजी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. उन्हाळ्याच्या दीर्घ उकाड्यानंतर आलेल्या पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, शेतक-यांची चिंता वाढविली. अवकाळी पाऊस आणि वादळी वा-यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झालेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी वादळी वा-यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. सध्या शेतात आंब्याची झाडे फळांनी लगडलेली आहेत.

अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मोहा परिसरात चांगल्या प्रमाणात आंब्याचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्याबरोबरच बागायती पीक, भाजीपालावर्गीय पिकांची नासाडी झाली आहे. मोहा परिसरात गावरान आंब्यासह केशर आंबा उत्पादन शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात घेत असतो. तसेच आंबा उतरविण्याचा हंगाम असून वादळी वारा आणि पाऊस तडाखा बसला आहे.

अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे. मान्सून पूर्व पावसाचा फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नुकसान भरपाई करण्याची मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे. मान्सून पूर्व पावसामुळे पन्नास टक्के आंब्याची गळती झाली असून पडलेला आंब्याला कोणताही ग्राहक हात लावत नाही तसेच झाडाला उरलेल्या आंब्यावर पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्यामुळे तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला असून पंचनामा करून शासनाने मदत करण्याची मागणी शेतकरी दिलीप जाधव यानी केली आहे.

बाजारपेठेवर मान्सूनपूर्व पावसाचे सावट
दरवर्षी केशर, पायरी असे अनेक नामांकित आंबे १५० ते २०० रुपये किलो प्रमाणे विक्रीला जातात. परंतु, यावर्षी झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे आंब्याचे दर घसरण्याची शक्यता तसेच पावसाचा आंब्यावर होणारा परिणाम याचा प्रश्न आंबा उत्पादक शेतक-यांना भेडसावत आहे. यामुळे मोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत लागणार असल्याने शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या