25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home उस्मानाबाद सास्तूर येथील अत्याचार झालेल्या पीडित मुलींसाठी निषेध मोर्चा !

सास्तूर येथील अत्याचार झालेल्या पीडित मुलींसाठी निषेध मोर्चा !

एकमत ऑनलाईन

लोहारा (अब्बास शेख) : लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील अतंत्य गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर शासन करावे पीडित कुटूंबाला तात्काळ दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावे तसेच या प्रकरणाला जलद गती न्यायालयात चालवावे, दोषींवर पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे, दिशा कायदा लागू करावे आदी मागण्या बाबत सकल समाजाच्या वतीने निषेध मोर्चा दिनांक 26 रोजी काढण्यात आला.

लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निषेध मोर्चा काढत तहसीलदार रोहन काळे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नऊ वर्षीय चिमुकली श्रीदुर्गा लांडगे याने सदर घटनेचा निषेध केला तसेच याप्रसंगी रंजना हसुरे, स्वाती जाधव, आशिष पाटील,गणेश सोनटक्के, डॉ स्नेहा सोनकाटे,अनिल गोयेकर, ऍड अनिरुद्ध येचाळे, युवराज जोगी,सह आदींनी सदर अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा मोर्चा दरम्यान निषेध करीत मनोगत व्यक्त केले.

या निवेदनावर सकल समाज बांधवाच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रसंगी पीडित अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रसंगी काढलेल्या निषेध मोर्चास अनेक संघटनांनी पाठिंबा देत निवेदन दिले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे ‘नेपोटिझम प्रॉडक्ट’ – घराणेशाहीवरून कंगणाचा ‘ट्विटवॉर’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या