30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउस्मानाबादमुरूम पालिकेवर टाळ मृदंगाच्या गजरात निषेध मोर्चा; दारु बंद न झाल्यास आंदोलनाचा...

मुरूम पालिकेवर टाळ मृदंगाच्या गजरात निषेध मोर्चा; दारु बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा

एकमत ऑनलाईन

मुरुम : मुरुम शहरात मानवी जीवनाला घातक ठरणारी खुलेआम विक्री होत असलेली रसायनयुक्त अवैध हातभट्टी दारू, ताडी, वारंवार मागणी करुनदेखील प्रशासनाकडून बंद करण्यात येत नाही. सोमवारी (दि.१२) महिला व एआयएसएफच्या युवकांनी पोलीस ठाणे व नगरपरिषदेवर टाळ मृदंगाच्या गजरात मोर्चा काढून निषेध व्यक्त करत अवैध दारू तात्काळ बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनद्वारे दिला आहे.

शहरांमध्ये सुमारे दहा ते पंधरा अवैध रसायन युक्त विषारी हातभट्टी दारू व ताडीचे दुकाने आहेत. ही दुकाने अवैधरित्या कोणत्याही परवानगीशिवाय शासनाच्या जागेवर खुलेआम चालवली जात आहे. गेल्या काही वर्षात शहरांमध्ये शेकडो लोकांना अशा विषारी दारूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येक माता भगिनींचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या विषारी दारूच्या नशेत अनेक महिलांचे शारीरिक आणि मानसिक छळ केले जात आहे. जाळून मारल्याचे प्रकार घडलेआहे असे गंबीर घटना घडून प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत आहे.

यामुळे दारूबंदी विभाग व पोलिस प्रशासनाचे अवैध दारू, मटका व जुगार चालवणाऱ्या ठेकेदारांसोबत आर्थिक हितसंबंध आहेत का? अशी शंका व्यक्त केली आहे. प्रशासनानी याची गंभीरपणे दखल घ्यावी अन्यथा यानंतर विषारी दारू मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या शवास पोलिस ठाण्यासमोर चिताग्नी, दफन करण्यात येईल. असे सांगितले आहे.

नगरपालिकेच्या जाग्यावर अवैध दारु दुकाने सुरु असल्याने त्यांच्यावर नगरपालिकेच्या माध्यमातूनही कारवाई होण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एआयएसएफचे लखन बोंडवे व राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त केले.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या