27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउस्मानाबादमोहा येथे आंदोलनकर्त्या डीसीसी कर्मर्चा­यांना सरपंचासह थकबाकीदारांकडून कोंडून मारण्याची धमकी

मोहा येथे आंदोलनकर्त्या डीसीसी कर्मर्चा­यांना सरपंचासह थकबाकीदारांकडून कोंडून मारण्याची धमकी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीतुन मार्गक्रमण करीत आहे. बँकेचे मोठमोठे कर्जदार कर्ज भरायला तयार नाहीत. साखर कारखान्यांकडे तसेच अन्य बिगरशेती सहकारी संस्थेकडे वाढलेली थ्ांकबाकी वसूल होत नाही. यामुळे थकबाकीदारांच्या घरासमोर बैठा सत्यागृह करण्याचा निर्णय घेतला असून हे सत्यागृह आंदोलन 21 मे पासून सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी काही ठिकाणी आंदोलनाला यश आले असून 2 लाख 92 हजार रुपयांची थकबाकी वसूली झाली आहे. दरम्यान, मोहा ता. कळंब येथे बँकेचे पथक वसुलीसाठी व बैठा सत्यागृह करण्यासाठी गेले असता त्यांना गावर्क­यांनी धमकावले. खोलीत कोंडून मारण्याचीही धमकी देण्यात आली. त्यामुळे पथकाला दिवसभर बँकेत बसून रहावे लागले.

जिल्हा बँक गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक संकटात आहे. बँकेची सहकारी साखर कारखान्याकडे वाढलेली थकबाकी, जिल्ह्यातील इतर काही बिगरशेती सहकारी संस्थाकडील जसे मजूर संस्था, प्रक्रिया संस्था, पगारदार संस्था यांच्याकडील वाढलेल्या थकबाकीमुळे आणि याशिवाय विकास सेवा सहकारी संस्थेच्या थकबाकीदार शेतर्क­यांकडील थकबाकीमुळे ही बँक आर्थिक अडचणीत आलेली आहे. मार्च 2022 मध्ये बँकेमध्ये नवीन संचालक अस्तित्वात आल्यानंतर चालुबाकी व थकीत कर्ज वसुलीसाठी सहमतीच्या धोरणाचा अवलंब करून कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील दोन महिण्यात चालुबाकीदारांची वसुली व पुनश्च वाटप करण्यात बँकेस र्ब­यापैकी यश आलेले आहे. 17 मे 2022 पर्यंत चालुबाकीची 85 टक्के वसुली होवून वसूल झालेल्या रक्कमेतून शेतर्क­यांना 173.96 कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील थकबाकीदारांकडुन मागील दोन महिन्यात बँकेच्या अधिकारी, कर्मर्चा­यांना वसुलीसाठी फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. बँकेकडील रोखता ही पुर्णत: संपलेली आहे. सामान्य ठेवीदारांना एक हजाराची सुद्धा ठेव देण्यासाठी निधी उपलब्ध नाही. मागील 10 ते 12 महिन्यापासून बँक कर्मर्चा­यांच्या पगार देता आलेले नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून बँकेने थकीत कर्जदार शेतकरी, बिगरशेती संस्थांचे पदाधिकारी यांचेकडील कर्जबाकी वसुलीसाठी एकरकमी समोपचार कर्ज परतफेड योजना लागू केली आहे. अशा थकबाकीदारांच्या घरासमोर बँकेचे कर्मचारी, गटसचिव, संस्था सचिव हे शनिवारी (दि.21) मे पासून बैठा सत्यागृह करीत आहेत. याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात एकूण 27 ग्रुप तयार करण्यात आले आहेत.

पहिल्या दिवशी उस्मानाबाद तालुक्यातील धारुर येथे बी.आर.कळंमकर यांच्या नेतृत्वाखाली सत्यागृह करण्यात आला. जागजी येथे व्ही.व्ही.वटाणे, शेलगाव ज. येथे आर.व्ही उगले, दारफळ येथे ए.जे.मगर, उमरगा तालुक्यातील औराद येथे डी.जी.शिंदे, मुळज येथे एमएम.जाधव, खेड येथे आर.एच.पाटील, कळंब तालुक्यातील मोहा येथे एस.एस.गायकवाड, लोहटा पुर्व येथे टी.ए.जाधव, रत्नापूर येथे एस.एम.दिवाणे, खामसवाडी येथे एस.टी.गायकवाड, वाशी येथे एल.यु.सोन्ने, तेरखेडा येथे एस.बी.सुकाळे, परंडा तालुक्यातील धोत्रा येथे एच.एम.दैन यांच्या नेतृत्वाखाली खकबाकीदारांच्या घरासमोर बैठा सत्यागृह आंदोलन करण्यात आले.

3 लाख 28 हजार 200 रुपयांची वसुली
21 मे पासून थकबाकी वसुली करण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी 3 लाख 28 हजार 200 रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. त्यामध्ये औराद ता. उमरगा येथून 5 हजार, मुळज येथून 25 हजार, खेड ता. लोहारा येथून 2 लाख 62 हजार, खामसवाडी ता. कळंब येथून 12 हजार, तेरखेडा येथून 4 हजार 200, धोत्रा ता.परंडा येथून 20 हजार रुपयांची वसूली झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या