19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत झेंडा लावण्यावरून दोन गटात राडा

उस्मानाबादेत झेंडा लावण्यावरून दोन गटात राडा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शहरातील विजय चौक येथे झेंडा लावण्याच्या कारणावरून व फेसबुकवर केलेल्या पोस्टवरून दोन गटात दगडफेक झाली. ही घटना मंगळवारी (दि.१९) रात्री १० वाजता घडली. या दगडफेकीत ६ पोलिस कर्मचा-यांसह अन्य कांहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस विभागाने रात्रीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवून दगडफेक प्रकरणी ४३ प्रमुख आरोपींसह १५० जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

उस्मानाबाद शहरातील विजय चौक भागात झालेल्या दगडफेक व पोलिसांवरील प्राणघातक हल्ला प्रकरणी ४३ प्रमुख आरोपींसह १५० जणांवर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दगडफेकीत ६ पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम ३०७ सह सरकारी कामात अडथळा आणणे कलम ३५३ सह अन्य १० वेगवेगळ्या कलमांने गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांकडुन आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी दिली.

आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करण्यासाठी पोलीस दलाचे काही कर्मचारी गेल्यानंतर त्यांच्यावर २५ ते ३० जणांच्या जमावाने विटा, दगड, फरशी फेकून हल्ला केला. त्यानंतर पोलिसांची इतर टीम आल्यावरही १५० ते २०० जणांनी पुन्हा हल्ला केला. यात सहायक पोलिस निरीक्षक सुर्वे, पोहेकॉ ९९२ शिंदे, पोना १४६१ चव्हाण, पोअ गोरे, आरपीसी प्लॅटुनचे जाधव व चंचलवाड हे कर्मचारी जखमी झाले. पोलीस कर्मचारी सायलू बिरमवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम ३०७,३३३,३३२,३५३,१४३,१४७,१४८,१४९, २९४ सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी फरार आरोपींचा शोध पोलिसांची पथके घेत असुन तपास पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत हे करीत आहेत.

दंगलखोरांचा शोध घेणे सुरू
उस्मानाबाद शहरातील विजय चौक येथे मंगळवारी रात्री टवाळखोरांनी अचानक दगडफेक करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. पोलिस वाहनावर दगडफेक करून नुकसान केले. दगडफेकीत ६ पोलिस कर्मचारी जखमी झाले. टवाळखोरांनी जाणीवपुर्वक पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केला. टवाळखोरांचा साध्या वेषातील पोलिस खाजानगर परिसरात शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या