25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउस्मानाबादकळंब येथे जुगार अड्ड्यावर छापा

कळंब येथे जुगार अड्ड्यावर छापा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने कळंब शहरात चालणार्‍या तिर्रट जुगारावर छापा टाकला. यामध्ये पोलीसांनी 9 जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व 4 लाख 49 हजार 980 रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच पोलीसांनी लोहारा तालुक्यातील पेठसांगवी, भूम, उस्मानाबाद शहरातही जुगार अड्ड्यावर कारवाई करून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांच्या पथकाने कळंब येथील सम्राट हॉटेल मागील शेतघरात छापा टाकला. यावेळी दिनकर वाडीक, फिरोज मुसाखॉन, महादेव मस्के, बाळासाहेब जाधव, रविंद्र अंधारे यांच्यासह 9 जण हे तिरट जुगार खेळत असताना रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून जुगार साहित्यासह 4 हजार 49 हजार 980 रुपये रक्कम पथकाने जप्त केली आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहारा पोलीसांना पेठसांगवी येथील एका पानटपरीसमोर कलीम शेख, दिलीप साठे, सतिश राजपुत हे सर्व कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यास 610 रक्कम बाळगलेले असताना आढळले. भूम पोलीसांना भूम बसस्थानक येथे गणेश महाडिक, जमिल शेख हे दोघे टायगर मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 10 हजार 500 रुपये रक्कम बाळगलेले असताना आढळले.

आनंदनगर पोलीसांना उस्मानाबाद येथील एका हॉटेलमागे महादेव चव्हाण, सोमनाथ चपणे हे दोघे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 6 हजार 350 रुपये रक्कम बाळगलेले असताना आढळले. या प्रकरणी पोलीसांनी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या