21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादउमरगा येथे जुगार अड्ड्यावर छापे, पोलिसांकडून ५७ हजार रूपये जप्त

उमरगा येथे जुगार अड्ड्यावर छापे, पोलिसांकडून ५७ हजार रूपये जप्त

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उमरगा पोलिस ठाण्याच्या पथकाने ९ ऑगस्ट रोजी शहरातील जुगार अड्ड्यावर छापे टाकले. यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा ५७ हजार ३४० रूपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगार विरोधी कारवाई करण्यासाठी उमरगा पोलिस ठाण्याच्या पथकाने ९ ऑगस्ट रोजी ३ ठिकाणी छापे टाकले. यात सराफ लाईन, उमरगा येथील हुसेन शेख व रत्नाकर सगर हे दोघे दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास उमरगा भाजी मार्केट येथील एका शेडसमोर कल्याण मटका जुगार चालवताना आढळले. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्यासह १९ हजार ३४० रूपये रोख रक्कम जप्त केली. तर त्याच परिसरात मुन्शी प्लॉट, उमरगा येथील दत्तु मदने हे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यास १ हजार २० रूपये रोख रक्कम बाळगलेले आढळले.

तसेच त्रिकोळी येथील तीसर्‍या छाप्यात त्रिकोळी येथील दिपक कुन्हाळे, नजीर मुल्ला, दत्तात्रय हंगरगे, पांडुरंग सांगवे, सचिन कोडे हे सर्व त्रिकोळी शेत शिवारातील एका शेडसमोर तिरट जुगार खेळत असताना पकडले. त्यांच्या ताब्यातून जुगार साहित्यासह रोख रक्कम असा एकुण ३६ हजार ९८० रूपयेचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या