23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeउस्मानाबादआ.तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ भूममध्ये रॅली

आ.तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ भूममध्ये रॅली

एकमत ऑनलाईन

भूम : शिवसेनेचे परंडा मतदार संघाचे बंडखोर आमदार प्रा. तानाजीराव सावंत यांना समर्थन देण्यासाठी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी दि. २७ जून रोजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी भूम शहरात मोठे शक्तीप्रदर्शन केले. घोषणाबाजी करीत भूम शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली.

शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले असून यामध्ये परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत सहभागी झाले आहेत. यानंतर आरोप प्रत्यारोप होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरत आहेत. आता बंडखोर नेते यांच्या समर्थनार्थही कार्यकर्ते रस्त्यावर उतरू लागले आहेत.

आ. सावंत यांच्या समर्थनार्थ भूम शहरात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी भूम शहरात सकाळी ११ वाजता साहिल कॉम्प्लेक्स ते गोलाई चौक अशी सावंत समर्थकांनी घोषणा देत रॅली काढली. सावंतप्रेमी समर्थक भूमचे माजी नगाध्यक्ष संजय गाढवे मित्र परिवाराच्या वतीने भव्य रॅली काढून शतीप्रदर्षन करण्यात आले.

या शक्तिप्रदर्शनात शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी कृषि सभापती दत्ता साळुंके, अण्णासाहेब देशमुख, वाशीचे माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, युवराज हूंबे, महिला आघाडी तालुका संघटक अर्चना दराडे, युवासेना तालुका प्रमुख नीलेश चव्हाण, शिवसेना तालुका उपप्रमुख शिवाजी भडके, तालुका प्रसिद्धी प्रमुख संग्राम लोखंडे, माजी पंचायत समिती उपसभापती बालाजी गुंजाळ यांच्यासह संजय गाढवे समर्थक व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आम्ही सावंत यांच्या पाठीशी : संजय गाढवे
आ. सावंत यांनी घेतलेला निर्णय योग्य असून आम्ही विकासाभिमुख नेतृत्व तानाजीराव सावंत यांच्या पाठीशी आहोत, असे भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी सांगितले. सत्तेत असतानाही व मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे खच्चीकरण केले, याचा पाढा वाचून दाखविला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या