20.8 C
Latur
Friday, January 22, 2021
Home उस्मानाबाद उस्मानाबादेत रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यास प्रारंभ

उस्मानाबादेत रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यास प्रारंभ

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शहरातील रामनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नगर परिषद शाळा क्रमांक २४ येथे सोमवारी (दि.७) पासून रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्यास सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी सुरवातीला ७ जणांची रॅपीड अँन्टीजेन टेस्ट करण्यात आली. यावेळी एक टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. शहरातील कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.

कोविड -१९ कोरोना व्हायरस महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी उपायोजनेचा महत्वाचा एक भाग म्हणजेच नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट झाल्या पाहिजेत. हे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या निदर्शनास खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर , आ. कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी आणून दिले होते. तसेच त्याचा पाठपुरावा केला होता. याची दखल घेत उस्मानाबाद शहरातील रामनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नगर शाळा क्रमांक २४ येथे सोमवारी (दि.७) पासून रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे याचा फायदा शहरातील व तालुक्यातील नागरिकांना होणार आहे.

उस्मानाबाद शहरातील व तालुक्यातील ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी इत्यादी लक्षणे असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्याने सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर येथील शाळा क्रमांक २४ येथे जाऊन आपली रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करून घ्यावी. नागरिकांनी कुठलाही आजार अंगावर न काढता वेळेवर उपचार घेण्यासाठी करण्यात आलेल्या सोयींचा लाभ घेऊन आपलं शहर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी नगरपरिषद व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.

7.3 लाख कोटीच्या मोबाइल फोन निर्यातीसाठी अ‍ॅपल आणि सॅमसंगला मंजुरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,415FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या