31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादभूम तालुक्यातील आंबी येथिल शेतकऱ्यांचा मावेजा साठी रास्ता रोको आंदोलन

भूम तालुक्यातील आंबी येथिल शेतकऱ्यांचा मावेजा साठी रास्ता रोको आंदोलन

लेखी आश्वासन मिळाल्या नंतर आंदोलन मागे

एकमत ऑनलाईन

आंबी : भूम तालुक्यातील आंबी येथील शेतकऱ्यांचे सर्वांचे मिळून ४५ हे . ७४ आर एवढे क्षेत्र कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पा साठी २०१० साली संपादित केला असून त्याचा मावेजा अध्याप पर्यंत मिळाला नाही. मावेजा मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने केली मात्र पोकळ अश्वसना व्यतिरिक्त काहीच मिळालं नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे , मौजे आंबी , ता . भूम येथील जमीन महाराष्ट्र शासनाने कृष्णा – मराठवाडा सिंचन योजना क्र. टप्पा क्र ३ ( ब ) साठी संपादित केलेली आहे . ही जमीन शासनाने २०१० साली ताब्यात घेतलेली आहे.

जमीन ताब्यात घेतल्या पासून त्याचा मावेजा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न शेतकऱ्यांनी केले . परंतु शेतकऱ्यांना त्याचा मावेजा काही मिळाला नाही . या संपादित जमिनीचा मावेजा तातडीने मिळावा म्हणून दि . ०२/११/२०२० रोजी शेतकऱ्यांनी दीड तासाचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला . यावेळी शेतकऱ्यांनी वेळकाडूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली. शेतकऱ्यांनी १०० % मावेजा मिळालाच पाहिजे , शेतकरी उपाशी प्रशासन तुपाशी , पैसा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा अशी फलके दाखवली.

यावेळी प्रशासणाचे प्रतिनिधि म्हणून आलेले मा . उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भूम आणि तहसीलदार भूम यांनी आंदोलकांशी चर्चा केली व सहा महिन्यात मागण्या पूर्ण केल्या जातील असे लेखी आश्वासन दिले त्या नंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले . त्या पूर्वी अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यात आले त्या ठिकाणी आपल्या व्यथा मांडल्या आंबी गावातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या याचे दाखले आंदोलकांनी याठिकाणी मांडले . शेतकऱ्यांनी आंदोलनावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व नियमांचे पालन केले व आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी शांतता पाळत आंदोलन केले . त्यामुळे कायदा व सुव्यवसंस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.

मांजरा धरण शंभर टक्के भरले; ओव्हर फ्लो झाल्याने दोन दरवाजे उघडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या