19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeउस्मानाबादरेशन दुकानदार यांचा बंदचा इशारा

रेशन दुकानदार यांचा बंदचा इशारा

एकमत ऑनलाईन

सतीश टोणगे कळंब : कोरोणा संसर्ग प्रमाण  मोठ्या प्रमाणात वाढले आहे या पाश्र्वभूमीवर धान्य देताना ग्राहकाचे अंगठे घेणे रद्द करावे दुकानदारांना विमा संरक्षण मिळावे कळंब तालुक्यातील कोरोणा योद्धा म्हणून काम करणारे रास्त भाव दुकानदार व त्यांच्या मदतनीस यांना कोरोणा योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात यावा आणि प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत धान्याचे वाटप करण्यात आलेले आहे त्याचे पुर्ण कमीशन बॅंक खातेवर जमा करण्यात यावी अशी मागणी कळंब तालुका रास्त भाव दुकान संघटनेच्या वतीने पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार श्रीमती. पठाण मॅडम यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की मागिल महिन्या प्रमाणे रास्त भाव दुकानदार यांच्या ठस्यानेच रेशन वाटपास परवानगी देण्यात यावी व रास्त भाव दुकानदार यांना कोरोणा पासुन बचाव करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कळंब तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार श्रीमती पठाण मॅडम यांच्याकडे दिले आहे जर या सर्व मागण्या मान्य न झाल्यास एक सप्टेंबर 2020 पासुन ना विलाजाने सर्व रास्त भाव दुकान संपावर जाणार आहेत असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर रवि तवले, डोंगरे दादा ,पिंगळे महाराज, रामराजे जगताप, माने, तानाजी गायकवाड, सतीश मते व ईतर दुकानदार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या