22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home उस्मानाबाद बंडखोरी बोराळकर यांच्या मुळावर तर चव्हाणांच्या पथ्यावर ?

बंडखोरी बोराळकर यांच्या मुळावर तर चव्हाणांच्या पथ्यावर ?

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपाला पोषक वातावरण असताना भाजपाचे रमेश पोकळे यांनी बंडखोरी करून उमेदवारी कायम ठेवली आहे. पोकळे यांची बंडखोरी भाजपाचे उमेदवार शिरिष बोराळकर यांच्या मुळावर येणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या पथ्यावर पडणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तर बोराळकर यांची प्रचार यंत्रणा थंडच आहे. सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची नेतेमंडळी, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते जिवाचे रान करताना दिसत आहेत. त्यामुळे चव्हाण यांची विजयाची हॅटट्रीक निश्चित मानली जात आहे.

विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात ३५ उमेदवार असल्याने ही बाब या मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या पथ्यावर पडणारी ठरली आहे. भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने भाजपाचे उमेदवार शिरिष बोराळकर यांची प्रचार यंत्रणा मतदान तोंडावर आले तरी अद्याप थंडच आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचे गावोगावी कार्यकत्र्यांचे नेटवर्क असल्याने व त्यांची जन्मभूमी उस्मानाबाद व कर्मभूमी औरंगाबाद जिल्हा असल्याने याचा थेट फायदा सतीश चव्हाण यांना होणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून या सरकारमधील मराठवाडा विभागातील मंत्री आपापल्या जिल्ह्यात सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी प्रचार करताना दिसत आहेत. आघाडीचे या मतदारसंघात बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख अशी ताकदवान मंत्र्याची फौज आहे. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासह अन्य ताकदवान नेत्यांचीही फळी आहे. भाजपामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेपाटील यांनी धावता दौरा करून सोपस्कार उरकले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही धावता दौरा करून प्रचार केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आ. राणाजगजितqसह पाटील हे बोराळकरांसाठी प्रचार करताना दिसत आहेत. अन्य नेतेमंडळी मात्र प्रचारात दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे बोराळकरांसाठी ही बाब qचतेची समजली जात आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ एकेकाळी भाजपाचा गड होता. परंतू या गडाला सुरूंग लावण्यात राष्ट्रवादी काँगे्रसला यश आलेले आहे. त्यामुळे आता औरंगाबाद मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात आहे. विद्यमान आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी सलग दोन टर्म विजय संपादन केला असून गेल्या १२ वर्षापासून ते या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन व स्व. गोपीनाथराव मुंडे हे मराठवाड्याचे सुपूत्र असल्याने त्यांची या मतदारसंघावर पकड होती. परंतू कालांतराने हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला. २०२० मधील ही निवडणूक वेगळी ठरत असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी असून त्यांचा एकच उमेदवार आहे. महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी नसल्याने ही निवडणूक सतीश चव्हाण यांच्यासाठी एकतर्फी ठरत आहे. याशिवाय विविध लहान-सहान पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

ही बाब महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या पथ्यावर पडणारी आहे. सतीश चव्हाण उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भातागळी गावचे मुळ रहिवाशी असून त्यांची कर्मभूमी औरंगाबाद जिल्हा आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम असून ते अध्यक्ष असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा, महाविद्यालय अनेक जिल्ह्यात आहेत. त्यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. याशिवाय महाविकास आघाडी असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदारांचे मेळावे घेण्यात आले आहेत. त्यामुळे सतीश चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी असल्यासारखे आहे.

भाजपमध्ये झालेली बंडखोरी व निष्ठावंतांना भाजपाने उमेदवारी न दिल्याने भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मन लावून कामाला लागले नाहीत. भाजपाचे उमेदवार घोटाळेबहाद्दर असल्याची प्रतिमा तयार झाली असून जात फॅक्टरही या निवडणुकीत चालण्याची शक्यता आहे. सतीश चव्हाण मराठा उमेदवार असल्याचा फायदा त्यांना होणार आहे. बोराळकर यांची प्रचार यंत्रणा थंडच असल्याने याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण व भाजपाचे शिरीष बोराळकर यांच्यामध्ये थेट लढत होत आहे.

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या