25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeउस्मानाबादउस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण घटल्याने दिलासा; रविवारी ४८६ नवीन रुग्ण

उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण घटल्याने दिलासा; रविवारी ४८६ नवीन रुग्ण

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक आलेल्या रविवारी (दि.२) अहवालावरुन थोडासा कमी झाल्याचे दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या घरात गेली असताना रविवारी ४८६ रुग्ण आढळले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यात कोरोनाची भिती कायम आहे.

देशात सर्वत्र कोरानाने मागील वर्षेभरापासून थैमान घातले आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातही प्रत्येक गावात थैमान घातले आहे. त्यात अनेक गावातील संपूर्ण कुटूंबातील व्यक्ती कोरोना बाधीत झाले आहेत. त्यामुळे असे कुटूंब घाबरुन जात आहे. घाबरल्यामुळे अनेकजण उपचारास साथ देत नसल्यामुळे त्यांना मृत्यूस सामोरे जावे लागत आहे. तसेच एखाद्याचा मृत्यू झाल्यास इतर आजारी व्यक्तीच्या आजारात आनखीन भर पडत आहे. त्यामुळेच मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र अशा व्यक्तींनी न घाबरता उपचारास सामोरे जाण्याची आज गरज आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी झपाट्याने पसरत आहे. रविवारी (दि.२) कोरोना ४८६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत ३९ हजार ५०१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३१ हजार ६७० रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ६ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सध्या सुरु आहेत. रविवारी ७१५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. उस्मानाबाद शहरासह तालुक्यात सर्वाधिक १९९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूर २७, उमरगा ४५, लोहारा ३०, कळंब ५६, वाशी ६६, भूम ५१ व परंडा तालुक्यात १२ रुग्ण सापडले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.

जिल्ह्यात आजवर २ लाख २४ हजार ३९४ नमुने तपासले त्यापैकी ३९ हजार ५०१ रुग्ण सापडले. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख पाहता १६ मार्चपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली आहे. ते आज २ में पर्यंत कायम वाढती राहिलेली आहे. तब्बल महिनाभरापासून ही लाट कायम आहे. जिल्ह्यात कोणतेच गाव आता शिल्लक राहिलेले नाही. त्यात आता मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांध्ये भितीचे प्रमाण वाढत आहे. शिवाय जिल्ह्यासाठी हा मोठा धोका आहे. जिल्ह्यात अशीच संख्या वाढत राहिली तर आरोग्य यंत्रणेवर तान निर्माण होणार आहे. तसेच रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेळी काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात १०० दिवसांत लसीकरण पूर्ण करावे; पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या