25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादच्या हातलादेवी डोंगरावर सापडले सातवाहन वसाहतीचे अवशेष

उस्मानाबादच्या हातलादेवी डोंगरावर सापडले सातवाहन वसाहतीचे अवशेष

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरालगत अससेल्या हातलादेवी डोंगरवर सातवाहनकालीन वसाहतीचे अवशेष सापडले आहेत. ब्राम्हीलेख असलेले सातवाहनकालीन नाणे तसेच प्राचीन वीटा खापराचे तुकडे सापडले आहेत. अशी माहिती इतिहास व पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे यांनी दिली आहे. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याला प्राचीन वैभवशाली असा इतिहास लाभला आहे. तेर हे सातवाहन काळातील मोठे व्यापारी नगर होते म्हणून तेरला येणार्‍या विविध प्राचीन मार्गावर ठिकठिकाणी सातवाहन कालीन वसाहती स्थापन करण्यात आल्या.

त्याचे अवशेष विविध भागात सापडले असून यात नव्या वसाहतीची भर पडली आहे. ही वसाहत उस्मानाबाद शहरातील एक प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र व पर्यटन केंद्र असलेल्या श्री हातलाई देवी डोंगर यावर सापडली आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी ब्राम्ही लेख असलेले सातवाहन कालीन नाणे इतिहास व पुरातत्व अभ्यासक संशोधक जयराज खोचरे यांना सापडले असून हा खूप महत्वाचा पुरावा हा काळ निश्चितीसाठीचा पुरावा समजला जातो. हे सापडलेले नाणे हे जस्त धातूचे असून अतिप्राचीन म्हणजे जवळपास दोन हजार वर्षे जुने आहे.

यावर एका बाजूवर हत्ती ब्राम्ही लिपीतील ज, म, गा, ल असे शब्द असून नाण्याच्या दुसर्‍या बाजूवर उजजैन चिन्ह आहे. नाणे, लेख हे अव्वल दर्जाचा पुरावा मनाला जातो. त्यामुळे येथील वसाहतीचा काळ ठरवण्यास मदत होईल. येथे प्राचीन विटा व खापराचे तुकडे, खापरी बुड मोठ्या प्रमाणावर इतिहास व पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे यांना सापडले असून त्यांना या भागात अजून काही ठिकाणी अशा वसाहती सापडल्या आहेत.

त्यामुळे इतिहास व प्राचीन मार्ग यावर नव्याने प्रकाश पडणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे धार्मिक व पर्यटन स्थळ आणि जवळ ही सापडलेली प्राचीन वसाहत अभ्यासक, पर्यटकांना नक्कीच पाहिला व अभ्यासाला उपयोगी पडेल व प्राचीन काळातील वैभवशाली इतिहास ही लोकांना कळून येईल. याच डोंगरावर जर साईट म्युझियम उभारले तर येथे सापडलेल्या वस्तु इथे ठेवता येथील जेणे करून त्याचे जतन व संवर्धन करता येईल, असे इतिहास व पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या