17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeउस्मानाबादवाशी येथे जनता कफ्र्युला प्रतिसाद

वाशी येथे जनता कफ्र्युला प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

वाशी : वाशी येथे जनता कफ्र्यूला येथील व्यापारी व नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक महिन्यापासून अलिप्त असलेल्या वाशी शहराला कोरोणाची लागण झाल्यामुळे वाशी नगरपंचायतच्या वतीने वाशी शहरात जनता कफ्र्यू लागू करण्यात आला आहे. या कफ्र्यूस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोणा व्हायरस महाराष्ट्रात आला. त्यानंतर विविध शहरांमध्ये तो दाखल झाला. अनेक शहरांमध्ये या कोरोणाने धुमाकूळ घातला, नागरिकांना त्रासून सोडले. सर्वत्र अशी परिस्थिती असताना देखील वाशी तालुका मात्र यापासून अलिप्त होता. येथील प्रशासनाने, नगरपंचायतने आणि येथील नागरिकांनी योग्य ती काळजी घेतल्यामुळे वाशी तालुक्याबरोबर वाशी शहरही कोरोणापासून अलिप्त होते. यानंतर वाशी तालुक्यातील गोजवडा, पिंपळगाव लिंगी या ठिकाणच्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली. या ठिकाणचे लोक बरे झाले आणि या दोन्ही गावातील कोरोणा संपुष्टात आला.

यानंतर अनेक दिवसांनी तालुक्यातील पारडी व तेरखेडा या ठिकाणी कोरोना पॉझिटिवचे रुग्ण आढळून आले. पारडी येथील कोरोणा आवाक्यात आला मात्र तेरखेडा येथे कोरोणाने चांगलाच धुमाकूळ घातला. वाशी शहराच्या आजूबाजूला कोरोणाचे रुग्ण आढळून येत असताना वाशी शहर मात्र कोरोणा पासून अलिप्त होते मात्र ३० जुलै रोजी येथे एक कोरोणा पॉझिटिव असल्याचा अहवाल आला आणि या शहराला ही कोरोणाची लागण झाली. यानंतरच्या काळात रुग्णांची संख्या वाढू लागली. या बाबीची दखल घेऊन वाशी नगरपंचायतने ३१ जुलै व १ ऑगस्ट असे दोन दिवस जनता कफ्र्यू लावला.

यानंतर १ दिवस सूट देऊन ३, ४, व ५ ऑगस्ट या तीन दिवसासाठी परत जनता कफ्र्यू लावला. या दरम्यान कफ्र्यू लावण्या अगोदर वाशी पोलिसांच्या वतीने वाशी शहरातून पथसंचलन ही करण्यात आले. वाशी नगरपंचायतच्या वतीने वाशीचे उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी यांनी जनता कफ्र्यूला साथ देण्याचे व्यापारी, शेतकरी व नागरिक यांना आवाहन केले. लावण्यात आलेल्या या जनता कफ्र्यू ला व्यापारी, शेतकरी व नागरिक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसापासून वाशी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत.

१५ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण
वाशी येथील कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांचा आढावा घेतला असता ०३ ऑगस्ट रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या अहवाला नुसार वाशी शहरांमध्ये १५ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांवर वाशी येथे उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णांवर वाशी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर उपचार करत आहेत.

Read More  जिल्ह्यात मंगळवारी १३७ कोरोना पॉझिटीव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या