25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबाद जिल्ह्यात जनता कफ्र्युला प्रतिसाद

उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कफ्र्युला प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार शनिवारी (दि. ४) जनता कफ्र्यूला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. उस्मानाबाद शहरासह लोहारा, उमरगा, तुळजापूर, भूम, परंडा, वाशी व कळंब तालुक्यात व्यापाèयांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवून सहभाग नोंदवला.

उस्मानाबाद शहरात सकाळपासूनच व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून जनता कफ्र्युमध्ये सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाला. तुळजापूर शहरासह तालुक्यात जनता कफ्र्यू निमित्त कडकडीत बंद पाळण्यात आला.

प्रशासनासोबत नेतेसुद्धा या जनता कफ्र्यूकरिता रस्त्यावर उतरले होते. या जनता कफ्र्यूला शहरातील नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळाला.शहरातील दुकाने बंद होती. शहर व ग्रामीण भागातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. लोहारा शहरासह ग्रामीण भागात जनता कफ्र्युला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा बसवेश्वर चौक, आझाद चौक आदी महत्वाची ठिकाणे व शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. शहरात व ग्रामीण भागातील अनेक गावात प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक चौरेसह कर्मचारी यांनी वाहनातून नागरिकांना घराबाहेर पडू नका, आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले होते.

Read More  पाक परराष्ट्रमंत्री कोरोनाग्रस्त

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या