22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeउस्मानाबादतुळजापूर येथे जनता कर्फुला प्रतिसाद

तुळजापूर येथे जनता कर्फुला प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूरात कोविड १९ च्या नियंत्रण व मुत्यु दर कमी करण्यासाठी बुधवार दि. २३ पासून पुकारलेल्या जनता कर्फुला शहरवासियांनी उस्फुर्तपणे मोठा प्रतिसाद दिला. जनता कर्फुच्या प्रथम दिनी शहरातील सर्व व्यवहार बंद होते तर शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.

जनता कर्फुच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागातील लोक शहरात न आल्याने शहरातील आज शासकीय निमशासकीय कार्यालये, बसस्थानक, बँका, मंदीर परिसरात वर्दळ कमी दिसुन आली तर काही ठिकाणी शुकशुकाट दिसुन आला.मोकाटपणे दुचाकीवर फिरणा-यांवर पोलिसांची कारवाई करण्यात आली.

दुचाकीवर रस्त्यावर फिरणारे, मास्क न वापरणारे, सोशल डिस्टंन्स न पाळणा-यांना पोलिसांनी उस्मानाबाद रस्त्यावर पुजारी मंडळ रस्त्यावर पकडून त्यांचा कडून दंड वसुल केला. पोलिसांनी कायद्याचे पालन न करणाèयांवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे मोकाट फिरणा-यांचे धाबे दणाणून गेले होते. तुळजापूर शहरात जनता कर्फु असल्याने रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे

भाविकांची गैरसोय
अधिक मासात श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ आले असता जनता कर्फु असल्याचे माहीती नसल्याने भाविकांना चहा नाष्टा पाणी मिळाले नाही तसेच नारळ प्रसाद ही न मिळाल्याने त्यांना गैरसोयीना सामोरे जावे लागले .

विनाकारण फिरणा-यावर कारवाई
जनता कर्फु पाश्र्वभूमीवर नगराध्यक्ष सचिन रोचकरी मुख्याधिकारी अशिष लोकरे, नगरसेवक यांनी शहरभर फिरून विनाकारण मोकाट फिरणा-यांना व मास्क न घालणा-यांना समज देवून कारवाई केली. तुळजापूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने जनता कर्फु लावण्याचा निर्णय घेतला आहे.

सोने लपवण्याचा धक्कादायक प्रकार तुम्ही पाहिलाय का?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या