34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeउस्मानाबादकोरोना रोखण्यासाठी लावलेले निर्बंध कागदावरच

कोरोना रोखण्यासाठी लावलेले निर्बंध कागदावरच

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाèयांनी यापुढील काळात कडक निर्बंध लावले असून तोंडाला मास्क, सोशल डिस्टंसिंग पाळणे, विवाह सोहळ्याला ५० व्यक्तींची उपस्थिती हे नियम न पाळणाèया वक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. परंतू नगर परिषद असलेली शहरे वगळता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र जिल्हाधिका-यांच्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. विवाहसोहळे मोठ्या लोकांच्या उपस्थितीत होत आहेत. कोणाच्याही तोंडाला मास्क दिसत नाही. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी लावलेले निर्बंध केवळ कागदावर आहेत.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दररोज २० ते २५ रुग्ण आढळून येत आहेत. जे लोक आजारी आहेत, त्यांचीच कोरोना चाचणी होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी आहे. पुर्वीसारख्या कोरोना चाचण्या वाढविल्या तर रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत वाढविला आहे. कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध यापुढेही कायम ठेवले आहेत. मोजक्या ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाहसोहळा तर २० व्यक्तींच्या उपस्थितीत मयतावर अंत्यसंस्कार करण्याचा नियम नव्याने लागू केला आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीविरुद्ध प्रथम दंडात्मक कारवाई तर दुस-या वेळी थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

तोंडाला मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड आकारला जात आहे. अशा स्वरुपाच्या कारवाया उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, परंडा, भूम, वाशी, उमरगा, लोहारा या सारख्या शहरात होताना दिसत आहेत. परंतू ग्रामीण भागात कोठेही कारवाया होताना दिसत नाहीत. शहरी भागात जिल्हाधिकाèयांच्या आदेशाचे काही प्रमाणात पालन होत आहे, मात्र ग्रामीण कोणीही तोंडाला मास्क बांधत नाहीत व कारवायाही होताना दिसत नाहीत.

ग्रामीण भागातही तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणाèया व्यक्तीविरोधात कारवाया सुरू केल्यास लोक भितीपोटी नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील काही शाळा कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी नव्याने ताब्यात घेतल्या आहेत. अचानक रुग्णसंख्या वाढत गेल्यास आरोग्य विभागाची धावपळ होऊ नये म्हणून पुर्वतयारी करण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाèया व्यक्ती विरोधात दंडात्मक कारवाया वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजअखेर कोरोना रुग्णांची संख्या १७ हजार २९८ झाली आहे. यापैकी १६ हजार ५६७ जणांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात १५० कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत ५८१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर ३.३६ टक्के आहे.

कोरोना पुर्णपणे संपलेला नाही, हे नागरिकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे जरी काटेकोरपणे पालन केले तरी कोरोना आटोक्यात येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी कारवाईची वाट न पाहता नियम पाळावेत. आजही जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे तर दवाखान्याचे बील लाखाच्या पुढे जात आहे.

लातूर शहरातील १०० ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या