कळंब : ईपीएस-९५ सेवानिवृत्त कर्मचार्यांनी पेन्शनमध्ये वाढ व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या आवाहनानुसार कळंब तालुका ईपीएस-९५ सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी (दि.११) सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या रक्ताच्या सह्या गोळा करण्याची मोहिम तालुकाध्यक्ष अच्युतराव माने यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसुळ, बाबा जोशी अरुण माळी, माधवसिंग राजपूत यांची उपस्थिती होती.
या सह्याचे निवेदन खासदार यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे. या निवेदनात राष्ट्रीय संघर्ष समिती या संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाविषयी व राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नाची माहिती असून मागणीसाठी गेली १० वर्ष संघर्ष करीत आहे. अल्प पेन्शनमध्ये वाढ करावी, अधिक महागाई भत्ता द्यावा, यासाठी देशातील औद्योगिक, सार्वजनिक, सहकार, खाजगी क्षेत्रातील ईपीएस-९५ पेन्शनर्स ज्यांनी सेवाकाळात पेन्शन फंडात अंशदान जमा केले आहे.
ज्यांनी देशाच्या नवनिर्माणात आपले रक्त व घाम गाळला आहे. या सर्वांचा विचार करून तात्काळ पेन्शनमध्ये वाढ करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर सेवानिवृत्त कर्मचारी रामभाऊ कवडे, बशीर पठाण, विनायक दशरथ, गुलाब बागवान, शिवाजी जगताप, शंकर मुळे, विष्णू दिवाणे, अनिरुद्ध पवार, रामभाऊ पाटोळे, आर.जी पुरी, राजाभाऊ आंधळे, बापू झाल्टे, सुरेखा कुलकर्णी, विठ्ठल राऊत, महादेव लकडे, सर्जेराव कोल्हे, सुधाकर लोमटे, डी.जे. अंगारखे, राजाभाऊ आळणे, अरुण गायकवाड, सुभाष पुरी, रामचंद्र वीर, श्रीहरी डावखरे, लक्ष्मण जाधव, महादेव लकडे, महादेव जगताप, रामचंद्र वीर यांच्या सह्या आहेत.