22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत सेवानिवृत्त प्राध्यापकाची अडीच लाखांनी ऑनलाईन फसवणूक

उस्मानाबादेत सेवानिवृत्त प्राध्यापकाची अडीच लाखांनी ऑनलाईन फसवणूक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक प्रल्हाद निवृत्तीराव दापके यांना बँक खात्याची माहिती विचारून ऑनलाईन २ लाख ३९ हजार ६५२ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रल्हाद दापके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ६ जुलै रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात आयटी अ‍ॅक्ट कलमानुसार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील माणिक चौकात राहणारे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रल्हाद दापके यांना ५ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास एका मोबाईल क्रमांकावरुन पुरुषाचा फोन आला. दापके यांच्या बँक खात्याविषयी माहिती सत्यापित करण्याच्या बहाण्याने त्याने दापके यांचे दोन्ही बँक खाते, डेबिट कार्ड क्रमांक व गोपनीय पासवर्ड विचारुन घेतले.

दापके यांनी काही एक विचार न करता त्या अज्ञात व्यक्तीस तशी माहिती देवून आलेले ओटीपी क्रमांक त्या व्यक्तीस सांगीतले. त्यानंतर त्यांच्या दोन्ही बँक खात्यातील एकूण २ लाख ३९ हजार ६५२ रुपये रक्कम दोन व्यवहारांत अन्यत्र स्थलांतरीत झाली. रक्कम हस्तांतरणाचे संदेश पाहिल्यावर दापके यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी प्रल्हाद दापके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात ६ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या