17.3 C
Latur
Friday, November 27, 2020
Home उस्मानाबाद येणेगूरात दरोडा, ईट, लोहारा येथे घरफोडी, उस्मानाबादेत सोयाबीन पळवली तर बोरी येथे...

येणेगूरात दरोडा, ईट, लोहारा येथे घरफोडी, उस्मानाबादेत सोयाबीन पळवली तर बोरी येथे पादचाऱ्यास आडवून लुटले

ईट येथे घरफोडी; दागिन्यासह ५ लाखाचा ऐवज लंपास

एकमत ऑनलाईन

ईट : भूम तालुक्यातील ईट येथील तंबाखू पानाचे व्यापारी शोकतअली तांबोळी यांच्या घरावर दसèयाच्या पूर्वसंध्येला अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. रविवारी (दि.२५) मध्यरात्री घरफोडी करुन सोने-चांदीसह रोख रक्कम ४ लाख ९० हजार रुपये पळविले आहेत. लग्नासाठी जमवलेल्या रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शौकतअली तांबोळी यांच्या घरी लग्नाची नियोजन असल्याने त्यांनी घरी सोने व चांदी घेऊन ठेवले होते . तसेच रोख रकमेची ही तजवीज केलेली होती. याची कुणकुण अज्ञात चोरट्यांना लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी २५ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजेच्या पुढे व पहाटे पाच वाजे पर्यंत ही घटना घडली. यामध्ये घराचे गेट न तोडता आत मध्ये प्रवेश करून ऐवज असणाèया खोलीतील घराचे कुलूप तोडून सोने-चांदी सह रोख रकमेवर डल्ला मारला. यावेळी तांबोळी यांचे कुटुंब बाजूच्या रूममध्ये झोपले असल्याने त्यांना याबाबत काही लक्षात आले नाही. याप्रकरणी तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम ४५७ /३८० भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणात फॉरेन्सिक सायन्स टीम व डॉग स्कॉड व पोलीस निरीक्षक यांचे पथक तपास कामी नेमण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास एपीआय चव्हाण हे करत आहेत व त्यांना सहकार्य पोलीस हेडकॉन्स्टेबल टकले आबा, कॉन्स्टेबल कुटे, करवर, भालचंद्र काकडे हे करत आहेत. याप्रकरणी लवकरात लवकर तपास लागावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

येणेगुर येथे महिलांना टामीने मारहाण करुन दागिन्यासह रोकड पळविली; २५ ते ३५ वयोगटातील तिघे असल्याचा महिलांचा दावा
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे चोरट्यांनी दरोडा टाकून घरात झोपलेल्या महिलांना टामीने मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील दागिने व घरातील ऐवज असा ९७ हजाराचा मुद्देमाल पळविला. ही घटना शनिवारी (दि.२४) मध्यरात्री घडली. यात २५ ते ३५ वयोगटातील तिघे असल्याचे महिलांनी पोलिसांना सांगितले आहे. याबाबत माहिती अशी की, येणेगुर येथील रमेश फुलचंद कागे व त्यांची पत्नी- रेणुका व आई- कमलाबाई असे तीघे शनिवारी (दि. २४) मध्यरात्रभ २.४५ वाजण्याच्या सुमारास घरी झोपलेले होते. यावेळी २५ ते ३५ वयोगटातील तीन अनोळखी पुरुषांनी रमेश कागे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडला. त्या तीघांपैकी एकजण बाहेर थांबला व दोघे घरात येउन रमेश कागे यांसह त्यांच्या पत्नीस टामीने मारुन जखमी केले व चाकुचा धाक दाखवुन रेणुका व कमलाबाई यांच्या अंगावरील दागिन्यांसह कपाटातील २८ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम १० हजार असा एकुण ९७ हजाराचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. याप्रकरणी रमेश कागे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात तिघावर मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहारा येथे घरफोडी; दागिने पळविले
शहरातील झिंगाडे प्लॉटींग येथे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यासह रोकड पळविली. ही घटना शनिवारी (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, लोहारा शहरातील झिंगाडे प्लॉटींग येथे दिपक खंडाळे हे शनिवारी (दि.२४) घरी झोपलेले असतांना त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने मध्यरात्री १.४५ वा. सु. गुपचूपपणे तोडले. यावेळी घरातील दागिन्याची पेटी घराबाहेर नेउन पेटीचा कडी-कोयंडा तोडून आतील ७.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने- वस्तू व रोख रक्कम ११ हजार रुपये चोरुन नेले. याप्रकरणी दिपक खंडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रविवारी (दि. २५) लोहारा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद येथून सोयाबीनचे ८ कट्टे लंपास
शहरातील ठाकरे नगर येथे घरात ठेवलेले ८ कट्टे सोयाबीन चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी (दि.२४) मध्यरात्री घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील ठाकरे नगर येथील गोवर्धन प्रल्हाद पवार यांच्या राहत्या इमारतीतील खालच्या मजल्यावरील दरवाजा नसलेल्या खोलीतील सोयाबीनचे ८ पोती प्रत्येकी ६० कि.ग्रॅ. वजन असलेली कट्टे चोरट्याने शनिवारी (दि.२४) मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहेत. याप्रकरणी गोवर्धन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदवला आहे.

नागरिकांत भितीचे वातावरण
जिल्ह्यात चोरी, दरोडा, घरफोडी, लुटालूट यासारख्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात आनखी भर म्हणजे दसरा मुहूर्तावर चोरट्यांनी हात साफ करत शिमगा केल्याचे दिसून आले. उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे दरोडा टाकून चोरट्यांनी घरातील महिलांना मारहाण करत दागिन्यासह रोकड पळविली. भूम तालुक्यातील ईट येथे घरफोडी करुन ५ लाखाचा मुद्देमाल पळविला. लोहारा येथेही घरफोडी करुन रोकडसह दागिने पळविले. उस्मानाबाद शहरातून सोयाबीनचे कट्टे तर तुळजापूर-उस्मानाबाद रस्त्यावर बोरी गावाजवळ पादèयास आडवून तिघांनी लुटल्याची घटना घडली आहे. मागील दोन दिवसात या पाच घटना घडल्या आहेत. चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुने निष्ठावंत व एक समृद्ध अडगळ !

ताज्या बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

आणखीन बातम्या

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

लॉकडाऊन काळातील कामगारांच्या रकमेवरही दलालांचा दरोडा

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा

उस्मानाबाद : मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेला तेरणा कारखाना मागील १० वर्षांपासून चक्क बंद आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे....

हजारो करदात्यांकडून पीएम किसान योजनेत कोट्यावधीची लूट

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम ) : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा पात्र नसतानाही हजारो करदात्या शेतकèयांनी कोट्यावधीची लूट केली आहे. या लुटारुमध्ये जिल्ह्यातील नामवंत धनदांडगे डॉक्टर,...

राज्य सरकारमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ लागेना

उस्मानाबाद : सध्याचे सरकार शाळा चालु करायच्या का नाही, विज बिले कमी करायचे का नाही, १०० युनिट मोफत द्यायचे का नाही, याबाबत गोंधळलेली आहे....
1,348FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...