22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeउस्मानाबादभाविकांची लूट, अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखलने खळबळ

भाविकांची लूट, अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखलने खळबळ

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : श्रीतुळजाभवानी नावाने डोमेननेम वापरुन चार व्यक्तींनी वेबसाईड काढुन भाविकांचे आँनलाईन पैसे घेवुन फसवणूक केली. याप्रकरणी मंदीर संस्थानने शनिवारी (दि.२३) राञी उशिरा तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकणी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल बापुराव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, श्री तुळजाभवानी मंदीराची अधिकृत वेबसाइट https://shrituljabhavani.org ही आहे. बुधवारी (दि.२०) अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांचे पत्र जावक क्र २०२१/उप चिटणीस / एनएजी ३/कावी -१२२९ बुधवारी (दि. २०) चे पत्र व बाळासाहेब वसंतराव सुभेदार छत्रपती संभाजी राजे कॉलनी, जाधववाडी रोड उस्मानाबाद यांचे तक्रारीनुसार तुळजाभवानीच्या नावाने बोगस वेबसाइट काढून भाविकांची दिशाभुल करून अर्थिक लुट प्रकरणी https://www.tuljabhavani.in ही वेबसाइट पाहणी करण्याचे आम्हास आदेशीत केल्याने आम्ही शनिवारी (दि.२३) सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान सदर वेबसाइडची पाहणी केली असता या वेबसाइडवरती तुळजाभवानी नावाने डोमेननेम वापरुन भाविकांचे ऑनलाइन पैसे घेवुन फसवणुक केली आहे.

वास्तविक पाहता सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अभिषेक पूजा विधी बंद आहेत. तसेच खालील डोमेननेम वापरुन भाविकांची फसवणुक व ऑनलाइन पैशाची लुट केली आहे.

1 ) https : //tuljabhavanipujari.com
2 ) https : //tuljabhavanimandir.org
3 ) https : // shrituljabhavani. com
4) https://epuja.co.in/productdetails.php?puja-idpageTuljapur-TuljaBhavani-Devi-Templea

वेबसाईटवरुन तुळजाभवानी नावाने डोमेननेम वापरुन भाविकांचे ऑनलाइन पैशे घेवून फसवणुक करणा-या व्यक्तीविरुद्ध कार्यवाही करावी अशी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुरंन ३६५/२१कलम ४२० माहीती तंञज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ ६६ सी, माहीती तंत्रज्ञान (सुधारणा)अधिनियम २००८ ६६ डी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या