30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home उस्मानाबाद पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

एकमत ऑनलाईन

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे. येथील विठ्ठल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या साठे-लोट्याने चालत आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये कार्यरत असताना वरकमाईपोटी हे लोक खासगी दवाखान्यांमध्ये काम करत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये नौकरी असताना अशा खाजगी हॉस्पिटलमध्ये या दवाखान्यातील लोक काम करू शकतात का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

वाशी येथे कॉलेज रोड, जुने तहसील कार्यालयाजवळ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मोठा गाजावाजा करत हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांपैकी बहुतांश डॉक्टर हे येथील सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहेत. दवाखाना खाजगी आणि डॉक्टर सरकारी अशी अवस्था या दवाखान्याची आहे. काही खासगी डॉक्टर्सही या दवाखान्यामध्ये आहेत. मात्र मुख्य सेवा हे सरकारी डॉक्टरच देतात, अशी माहिती मिळाली आहे. सरकारी पगार घेऊन सरकारी दवाखान्यांमध्ये येणाèया रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणे हे डॉक्टरांचे काम आहे. मात्र याठिकाणी या डॉक्टरांना जास्तीचे पैसे कमावण्यासाठी खाजगी रुग्णालयाचा वापर करण्यात येत आहे. या दवाखान्यामध्ये ज्याप्रकारे सुविधेबाबत जाहिरात केलेली आहे, त्या सुविधा कोणत्याही उपलब्ध नाहीत. अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. सुविधा नसल्यामुळे एक वृद्ध व्यक्ती दगावल्याचीही नागरिकामध्ये चर्चा आहे.

…जखमा उरातल्या !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या