26.8 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeउस्मानाबादकृषी कायदे रद्द करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीपासुन देशाला वाचवा - शेतकरी नेते...

कृषी कायदे रद्द करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीपासुन देशाला वाचवा – शेतकरी नेते राकेश टिकैत

एकमत ऑनलाईन

उमरगा : शेतकरी आंदोलनात गेल्या काही दिवसांत प्रमुख चेहरा बनलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे महाराष्ट्रा मधील पहिली किसान संवाद परिषद ही स्वातंत्रच्या अमृत महोत्सव व महात्मा गांधी जयंती निमित्त उमरगा शहरात दि २ शनिवारी रोजी दु पडली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुण संदीप गड्डे, महिंद्रसिंग, तेलंगणा शेतकरी नेते नायडू व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदय गवारे यांची उपस्थित होती.

हरियाणाचे शेतकरी नेते युधवीर सिंह शेतकरी संबोधित करताना म्हणाले ,” गेल्या १० महिन्यात आंदोलन मध्ये ७०० शेतकरी मरण पावले आहेत, हे सरकारचे अपयश आहे.तसेच शेतकरी आंदोलन इतके दिवस सुरू असतानाही केंद्र सरकार केवळ गप्प आहे. मागील १० महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसलेले आहेत. देशाची संपत्ती विकणाऱ्यांना आपण ओळखलं पाहिजे. देशात रेल्वे, जहाज आणि विमानतळं विकले जाणार आहेत.नैतिकता आसेल तर जबाबदारी घेऊन केंद्र सरकारने राजीनामा द्यावा ”

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी महाराष्ट्रमध्ये किसान संवाद माध्यमातून कृषी कायदे तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर टीका केली.केंद्रात कोणतेही सरकार नाही कंपन्या सरकार चालवत आहेत. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी कृषी कायदे आणले आहेत ही दरोडेखोरांची टोळी आहे. त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करावा लागेल आणि देशालाही वाचवावं लागेल, असं शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले.

यावेळी प्रास्ताविक विनायकराव पाटील,मनोगत उदय गोवरे, जितेंद्र शिंदे, यांनी व्यक्त केले.या वेळी माजी तेलंगणा नेता पी नायडू, सभापती जिंतेंद्र शिंदे, विजयकुमार सोनवणे, बलभीम पाटील, मधुकर यादव, नानासाहेब भोसले, बाबा औटी आदी उपस्थित होते.आभार दिलीप गरुड व सूत्रसंचालन कमलाकर भोसले आणि शौकत पटेल यांनी केले. यावेळी मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या