21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeउस्मानाबादशालेय विद्यार्थीनीची छेडछाड करून विनयभंग

शालेय विद्यार्थीनीची छेडछाड करून विनयभंग

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : एक १४ वर्षीय शालेय विद्यार्थीनी शाळेतून घरी जात असताना तीची छेड काढून विनयभंग करणार्‍या एका तरूणावर बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थीनीची छेड काढण्याचा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावातील एक १४ वर्षीय विद्यार्थीनी शाळेत जात असताना जून २०२२ पासून एक तरूण तीचा वेळोवेळी पाठलाग करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. दि. २९ जुलै रोजी ती विद्यार्थीनी शाळेतून घरी येत असताना त्या तरूणाने मोटारसायकलवर येवून तीच्या समोर आपली मोटारसायकल आडवी लावली. तीला विनाकारण बोलून तीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीवरून त्या तरूणाच्या विरोधात बेंबळी पोलिस ठाण्यात कलम ३५४ (ड) सह पोक्सो कायदा व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या