20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeउस्मानाबादग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात शाळा सुरू

ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात शाळा सुरू

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा तब्बल दिड वर्षानंतर गुरुवारपासून दि. १५ जुलै सुरू झाल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणाला कंटाळलेल्या आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. काही शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शहरी भागातील शाळा मात्र अद्याप कुलुपबंदच आहेत.

आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा गुरुवारपासून सुरू झाल्या आहेत. ज्या गावात गेल्या ३० दिवसापासून एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही, अशा गावच्या शाळा सुरू करण्यास काही निकषांच्या आधीन राहून शासनाने परवानगी दिली आहे. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. परंतु जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तब्बल दिड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. जिल्ह्यातील जवळपास ५०० गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्या अनुषंगाने शासनाने अध्यादेश जारी करून काही अटींच्या अधीन राहून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

ज्या गावात एक महिन्यापासून कोरोना रुग्ण सापडलेला नाही, अशा गावातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करायची का नाही याचा निर्णय संबंधित गावची ग्रामपंचायत घेणार आहे. त्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची समिती बैठक घेऊन निर्णय घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी संबंधित पालकांचे संमतीपत्र बंधनकारक आहे. जिल्ह्यात प्राथमिक शाळांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या कमी आहे.

गुरुवारी काही गावातील शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून विद्याथ्र्यांची सॅनीटायझरसह ऑक्सीमीटरने तपासणी केली जात आहे. एका बाकड्यावर एका विद्याथ्र्याला बसविले जात आहे. अनेक दिवसानंतर शाळा सुरू झाल्याने शिक्षक, मित्र, मैत्रिणींना भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेह-यावर दिसून येत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात केवळ ५४५ रुग्ण उपचार घेत आहेत. आजअखेर जिल्ह्यात ५९ हजार २०९ कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी ५७ हजार २८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. १३८३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९६.७४ टक्के आहे. कोरोना तपासणीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण ३ टक्के आहे.

घटस्फोटास कारण की…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या