27 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरु : जिल्हाधिकारी दिवेगावकर

जिल्ह्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरु : जिल्हाधिकारी दिवेगावकर

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये विद्यार्थी त्यांचे स्वत:चे घरुन येणे-जाणे करतात. अशा शाळांमधील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सोमवारी (दि.२३) पासून सुरु करण्यात यावेत, तथापि निवासी वसतिगृह, आश्रमशाळा चालू करण्यात येऊ नयेत. ९ ते १२ वी चे वर्ग सुरु करताना प्रत्येक शाळेमध्ये थर्मामिटर, थर्मल स्कॅनर, गण, पल्स ऑस्कीमीटर, जंतूनाशक, साबण, पाणी यांचा वापर करणे तसेच मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यामध्ये कोविड-१९ चे अनुषंगाने जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद व जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये, कोविड केअर सेंटर्स याठिकाणी आरटीपीसीआर चाचणी व रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टची व्यवस्था उपलब्ध असून जिल्ह्यातील नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, श्वसनास त्रास होणे, डोकेदुखी इ. कोविड-१९ ची लक्षणे आढळून आल्यास आजार न लपविता तात्काळ वरिल नमूद ठिकाणी जाऊन कोविड-१९ ची तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले. शाळा सुरु करण्यात आल्या तरी पालकांवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची सक्ती करु नये. गर्दी न होऊ देता समुपदेशन आयोजित करुन घरी कोणता अभ्यासक्रम स्वयंअध्ययनाने पूर्ण करता येऊ शकतो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी विषयनिहाय स्वयंअध्ययन शक्य असलेला अभ्यासक्रमातील भाग याची सूची बनवून इयत्ता व विषयनिहाय पालकांना देता येईल असा प्रयत्न करावा.नागरिकांना सूचित करण्यात येते की, कोविड-१९ संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून मास्कचा वापर न केल्याने व सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंन्सींग) पालन न केल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे कोविड-१९ बाबत शासन निर्देशांचे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी सूचित केले आहे. ज्या संस्थांना आपल्या निवासी शाळा सुरु करावयाच्या आहेत त्यांनी अनिवासी शाळेप्रमाणे केवळ वर्ग भरवावेत. हॉस्टेल व इतर राहण्याच्या सुविधा सुरु करता येणार नाहीत. अशा परिस्थितीत पुढील सूचना येईपर्यंत ऑनलाईन सुविधा पुरविणे उचित राहील, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात पुन्हा ५८ रुग्णांची वाढ
जिल्ह्यातील शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरु होत असल्याने आरोग्य विभागाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची कोरोना चाचणी सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोरोना चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्याही वाढली आहे. त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक, कर्मचारी कोरोनाबाधीत असल्याचे आढळून येत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात ८७ रुग्ण आढळून आले होते. शनिवारी यामध्ये ५८ रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये काही शिक्षकांचा समावेश आहे. प्रशासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवेढयाच्या आवताडे कंपनीला ३१ कोटीचा दंड

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा

उस्मानाबाद : मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेला तेरणा कारखाना मागील १० वर्षांपासून चक्क बंद आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे....

हजारो करदात्यांकडून पीएम किसान योजनेत कोट्यावधीची लूट

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम ) : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा पात्र नसतानाही हजारो करदात्या शेतकèयांनी कोट्यावधीची लूट केली आहे. या लुटारुमध्ये जिल्ह्यातील नामवंत धनदांडगे डॉक्टर,...

राज्य सरकारमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ लागेना

उस्मानाबाद : सध्याचे सरकार शाळा चालु करायच्या का नाही, विज बिले कमी करायचे का नाही, १०० युनिट मोफत द्यायचे का नाही, याबाबत गोंधळलेली आहे....

जिल्ह्यात तीन ठिकाणी घरफोडी; लाखोंचे दागिन्यासह रोकड पळविली

उस्मानाबाद : जिल्ह्यात घरफोडी, लुटालूट, दरोडे, हाणामारी यासारख्या घटना सुरुच आहेत. दिपावलीनिमित्त घरातील नागरिक गावाकडे गेल्याचा फायदा घेवून घरफोडी होत आहेत. उस्मानाबाद शहरातील आदर्शनगर...

विद्यार्थ्यांसाठी शाळेचा रस्ता खडतरच, अनेक शिक्षकांना कोरोनाने घेरले

उस्मानाबाद (सुभाष कदम) : राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली असून त्या पार्श्वभूमीवर या वर्गांना अध्यापन करणार्‍या शिक्षकांची...

बांधकाम मजुरांच्या योजनांवर कामगार अधिकारी, दलालांचा डल्ला

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांना या...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...