कळंब : शहरातील एकाच कुटुंबातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. रहाते घराचा परिसर व सोनार गल्लीचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेले आणखी एका कुटुंबाची माहिती घेऊन त्यांचेही नमुने घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर त्यांची दुकाने सील करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार अस्लम जमादार यांनी दिली.
दरम्यान दोन्ही कुटुंबाच्या संपर्कात जवळपास तीनशेहुन अधिकजन संपर्कात आल्याची माहिती आहे. यामुळे कळंबकरांची धाकधूक वाढली आहे. तर दोन्ही कुटुंबांनी माहिती लपवत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. एकही रुग्ण नसणा-या कळंब शहरात पंधरा दिवसात नुई रुग्ण झाले आहेत. सध्या पॉझिटिव्ह निघालेल्या कुटुंबात जेष्ठ महिलेचे निधन झाले होते. तत्पूर्वी त्यांच्या समाजाच्या रीती रिवाजूनर काही दिवस पुणे, औरंगाबादसह परगावावरून अनेकजण आले होते. त्यातूनच कोरोना फैलाव झाला.
दरम्यान ज्या व्यक्तीच्या हे सर्व लोक संपर्कात आले होते. एका महिलेला त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची चाचणी घेतल्यानंतर आता कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यात देखील एकदिवस उशिरा ही माहिती बाहेर आली. त्यानंतर पालिकेने परिसरात फवारणी केली. त्यानंतर हे कुटुंब एका लॉजवर राहिले. त्यातील चौदा जणांचे रिपोर्ट काल आले. त्यात सात जणांना लागण झाल्याचे रिपोर्ट आले आहेत. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
आता प्रशासन त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेत आहे. प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत दोन्ही कुटुंब सील केले असते तर धोका वाढला नसता. कोरोनाची लागण झालेल्या कुटुंबाचे व्यवसाय आहेत. त्याठिकाणी अनेक कामगार आहेत. त्यातील काहीजण थेट या कुटुंबाच्या संपर्कात आलेले आहेत. रुग्णाला घेऊन गेलेले ते वाहन चालक गायब झाले आहेत. दोघेही जवळच्या खेड्यातील आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेणे आवश्यक आहे. तर घरकामास असणाèया महिला देखील असून, त्यांनाही क्वारटाईन केलेले नाही. त्यामुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More सार्वजनिक उत्साहावर कोरोनाचे सावट : साध्या पध्दतीने सण-उत्सव साजरे