21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत विवाहितेवर लैंगिक अत्याचार

उस्मानाबादेत विवाहितेवर लैंगिक अत्याचार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील एका ३८ वर्षीय विवाहितेवर एका तरूणाने ती घरात एकटी असल्याची संधी साधून बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना २८ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात २९ जुलै रोजी कलम ३७६ सह दलित अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील एक ३८ वर्षीय विवाहीत महिला (नाव- गाव गोपनीय) दि. २८ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास तीच्या राहत्या घरी घराचे दार पुढे करुन झोपली होती.

त्यावेळी एका तरूणाने तीच्या घरात प्रवेश केला. त्याने तीच्या पती विषयी विचारणा करुन ती घरी एकटी असल्याची संधी साधून त्या महिलेवर लैंगीक अत्याचार केला. यावेळी त्या महिलेने आरडा-ओरडा केला असता त्याने तीला घडल्या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी दमदाटी करुन तो तेथून पसार झाला. या प्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात त्या तरूणाच्या विरोधात २९ जुलै रोजी कलम ३७६ सह दलित अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या