25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home उस्मानाबाद कळंबच्या महावितरण कार्यालयात सावळा गोंधळ

कळंबच्या महावितरण कार्यालयात सावळा गोंधळ

शहरवासीयांतून तिव्र संताप

एकमत ऑनलाईन

सतीश टोणगे कळंब :येथील महावितरण कार्यालयात गेल्यास नागरिकांच्या समस्या तर सोडच अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात असून नागरिकांना त्यामूळे नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे.

कळंब शहराचा विद्युत पूरवठा करणाऱ्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या त्यांच्याच विद्युत कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसल्याने शहरातील विविध भागात सतत विज पूरवठा बंद असतो त्यामुळे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना विविध समस्यांना सतत तोंड दयावे लागत आहे.

विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास संबधित कार्यालयात फोन  कधीच लागत नाही सतत बीझी मोडवर फोन असतो एखादया कर्मचाऱ्याला फोन केला तर तो उचलत नाही. कार्यालयात कोणी गेले तर कार्यालयात  आधिकारीच सतत गायब असतात . त्यामुळे इतर कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देतात.

काल रविवारी शहरातील रंगीला चौकात विद्युत पुरवठा करणाऱ्या एका डि. पी. ला अचानक आग लागली त्यामुळे एकच गोंधळ उडाला कांही नागरीकांनी विद्युत कार्यालयात फोन केला मात्र एक तासभर कोणीही आले नाही. त्यानंतर नगरपालिकेच्या अग्गीशामक दलाचा कर्मचार्‍यांनीआण डि.पी. ची आग विझवली त्यामुळे सुदैवाने यात काही जिवीतहानी झाली नाही.

मात्र यामुळे महावितरणाच्या सावळया गोंधळाचा कारभार पून्हा समोर आला आहे. कमीत कमी वरिष्ठांनी लक्ष घालून संबधीत अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी शहराचा विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी शहरवासीयांतून  केली जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या