कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले होते. त्यामधील शिवश्री शिवशंकर शिवपुत्र होनराव लिंगायत समाजाचा तरुण आज अतिशय आर्थिक अडचणी मध्ये आहे. सद्यस्थितीमध्ये त्याच्या पायाचे मेजर ऑपरेशन झाल्यामुळे आणि त्याच्या कुटुंबामधील तोच एकमेव कमवता आहे. लॉकडॉउनमुळे कुठलाही काम धंदा नसल्याने आणि आरोग्य खर्च मोठ्या प्रमाणत झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
गाडी चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा तो चालवत होता परंतु, त्याचा डावा पाय पूर्णता निकामी झाल्याने आणि तो घरीच असल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. भांडारकरमधील कारवाई मध्ये अग्रेसर असणारा मावळा शिवश्री शिवशंकर होनराव यांचं नुकतच सोलापूर या ठिकाणी डाव्या पायाचे मोठे ऑपरेशन करण्यात आले आहे. भांडारकर कारवाईनंतर अनेक पदाधिकारी संभाजी ब्रिगेड च्या नावाने दुकान स्थापन करून मोठे झाले. परंतु ७२ शिवक्रांतीवीर म्हणून गौरव व्यतिरिक्त या मावळयाकडे आजही कोणी डोकावून बघायला तयार नाही.
संभाजी ब्रिगेड सामाजिक चळवळीकडून राजकीय चळवळी कडे गेली आहे. त्यातून अनेकांचं राजकीय भवितव्य उद्या परिपक्व होऊन अनेक जण आमदार-खासदार होतील. व झाले ही,परंतु, ज्यांच्या जीवावर संभाजी ब्रिगेड मोठी झाली त्यांचे भवितव्य आजही अंधारात आहे. संभाजी ब्रिगेडचा मूळ पाया हा संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून भांडारकर संस्थावर कारवाई करणारे हेच शिवक्रांतीविर आहेत. त्यांची सध्याची अवस्था दयनीय आहे,हे वास्तव माहीत असूनही कोणताही संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी अथवा संभाजी ब्रिगेडचे प्रमुख ढुंकूनही पाहायला तयार नाहीत.
त्यामुळे समाजाचं काहीतरी देणं आपण लागतो ही प्रामाणिक भूमिका संभाजी ब्रिगेड चे नाव वापरून मोठे झालेल्या बांधवानी काहीतरी मदत करून करावी.पोकळ शाब्दिक आश्वासने न देता भरीव मदत शिवश्री शिवशंकर होनराव करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने काही आर्थिक सहकार्य करावे. असे आवाहन महेश टेळे पाटील यांनी केले आहे.
सास्तुर येथे मोबाईल युनिटव्दारे तपासणी मोहिमेचा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ