उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढतच असून आज जिल्ह्यात नवीन १२ रुग्ण आढळून आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातून ४५ स्वाब लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून २९ रिपोर्ट निगेटीव्ह तर १२ रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत तर ४ स्वॅबचा रिपोर्ट अनिर्णित आला आहे.
आज आलेल्या १२ पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये ८ रुग्ण कळंब तालुक्यातील शिरढोण येथल असून हे सर्व पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. दोन रुग्ण हासेगाव तालुका कळंब येथील असून ते पूर्वीच्या अंदोरा येथील संपर्कातील आहेत. तर दोन रुग्ण हे ढोकी येथील असून ते पुणे येथून प्रवास करून आलेले आहेत.
#उस्मानाबाद येथून 45 sample लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी12 #पॉझिटिव्ह, 4 inconclusive व 29 #निगेटिव
— District Information Office,Osmanabad (@dioosmanabad) June 5, 2020