22.3 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeउस्मानाबादशिवसेनेच्या गद्दार आमदारांच्या पुतळ्यास मारले जोडे

शिवसेनेच्या गद्दार आमदारांच्या पुतळ्यास मारले जोडे

एकमत ऑनलाईन

नळदुर्ग : आ. तानाजी सावंत, आ. ज्ञानराज चौगुले यांच्या पुतळ्याची काढली धिंड
नळदुर्ग : नळदुर्ग शहर व परिसरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे गद्दार आ. तानाजी सावंत व आ. ज्ञानराज चौगुले यांच्या पुतळ्यास जोडे मारत चावडी चौक ते एसटी स्टँडपर्यंत धिंड काढण्यात आली.

यावेळी कमलाकर चव्हाण यांनी प्रखर तिखट भाषेत उध्दव ठाकरे यांना दगा देणार्‍या एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले जिल्ह्यातील दोन आमदार तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले व इतर सर्व त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांचा खरपूस समाचार घेतला. जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सोबत आहोत असे सांगितले.

यावेळी माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडके पाटील, उपतालुका प्रमुख प्रदिप मगर, सरदारसिंग ठाकूर, कृष्णात मोरे, शाम माळी, शहर प्रमुख संतोष पुदाले यांनी आपल्या भाषणात या गद्दार आमदारांचा तिव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला. आंदोलनात माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख राजेंद्र जाधव, उपशहर प्रमुख शाम कनकधर, जळकोट तंटामुक्त अध्यक्ष यशवंत पाटील, जळकोटवाडीचे सरपंच शिवाजी कदम, होर्टीचे सरपंच ज्ञानेश्वर भोसले, अणदूर विभाग प्रमुख मनोज कस्तुरे, मुर्टा उपसरपंच कुमार मोरे, किलजचे दगडू शिंदे, नंदगावचे परमेश्वर चिनगुंडे, सिध्देश कुंभार, बर्वे, अनिल छत्रे, बळी मेनशेट्टी, चिवरीचे दत्ता भोसले, मकरंद भालकरे, सुर्यकांत घोडके, दयानंद घोडके, उपशहर प्रमुख सोमनाथ म्हेत्रे, ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख नेताजी महाबोले, युवासेना शहर प्रमुख मयुर हुलगे, भिमा कोळी, महादेव पवार, चंदर सगरे, राजु कोळी यांच्यासह नळदुर्ग व परिसरातील सर्व शिवसैनिक, नागरिक सहभागी होते.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या