34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeउस्मानाबादभंडारी जवळील हॉटेलचालकावर गोळीबार; हॉटेलमालक गंभीर जखमी

भंडारी जवळील हॉटेलचालकावर गोळीबार; हॉटेलमालक गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तुळजापूरहून लातूरकडे जाणा-या महामार्गावरील भंडारी शिवारात एका हॉटेलचालकावर दोन गोळ्या झाडल्याची घटना आज दि, 3 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली आहे. यात हॉटेलचालक गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. लातूरकडे जाणा-या महामार्गावर भंडारी शिवारात बाळासाहेब दामोदर मोरे यांचे रिलॅक्स हॉटेल आहे. या हॉटेलवर बुधवारी दुपारी पुणे पासिंग असलेल्या एका जीपमधून 6 तरुण आले होते. त्यांनी मोरे यांच्याशी जेवण चांगले बनवले नाही म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर एकाने त्याच्याकडील बंदूक काढून समोरून 2 गोळ्या झाडल्या.

त्या चुकविण्याचा प्रयत्न मोरे यांनी केला पण एक गोळी त्यांच्या पोटात लागून ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर 5 व्यक्ती जीपमधून पसार झाल्या. तर प्रत्यक्षदर्शींनी यातील एकास मारहाण करून पकडून ठेवले आहे. त्याला पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले. हॉटेलमालक बाळासाहेब मोरे यांना लातूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे, बेंबळी ठाण्याचे सहायक निरीक्षक मंिच्छद्र शेंडगे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी रवाना झाले आहेत. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही, पोलीस त्याचा तपास करीत आहेत, या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जागतिक पॅरा अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधवची निवड

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या