31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादलिफाफे, मतपेटी निवडणूकीचा आत्मा असल्याने अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी

लिफाफे, मतपेटी निवडणूकीचा आत्मा असल्याने अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी घेण्यात येणारे मतदान ईव्हीम मशीन ऐवजी ते छापील मत पत्रिकेवर घेण्यात येत आहे. या निवडणूकीत मत पत्रिका हिशोब लिफाफा, केंद्र अध्यक्षाची दैनंदिनी लिफाफा, कागदी मोहरांचा हिशोब लिफाफा, झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा लिफाफा, सुरक्षा शीट व मतदाना दिवशी केंद्र परीसरात झालेल्या सर्व घटनांचा उल्लेख असलेला लिफाफा अशा सहा लिफाफ्याबरोबरच मतपेटी हा निवडणूकीचा आत्मा आहे. याबाबत सर्व संबंधित अधिका-यांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.

येथील नगरपरिषदेच्या शिवाजी महाराज नाटयगृहात पदवीधर मतदार संघासाठी क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास व नियोजनचे उपायुक्त अविनाश गोटे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.चारूशिला देशमुख, पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले (उमरगा), अहिल्या गाठाळ (कळंब), मनीषा राशिनकर (भूम) यांच्यासह सर्व तहसिलदार व नायब तहसिलदार उपस्थित होते.

पुढे बोलताना दिवेगाकवर म्हणाले, मतदान अधिका-यांनी मतदानाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन व हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येत असून या प्रशिक्षणात मतदानाच्या अनुषंगाने सर्व बाबींची माहिती संबंधितांनी घ्यावी. हे पहिले प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. उर्वरीत दोन प्रशिक्षण ही महत्वाची असून सर्व अधिकाèयांनी वेळेवर उपस्थित राहावे. कोणीही टाळाटाळ करू नये, असे त्यांनी सूचित केले. विशेष म्हणजे कोरोनाच्या नावाखाली कोणीही मनाने क्वॉरंटाईन व्हायचे नाही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष असून न्टेजन तपासणीसह आरटीपीसीआर तपासणी करून घेण्यात येणार आहे.

निवडणूकीसाठी आवश्यक असलेले साहित्य व्यवस्थित वाटुन घेऊन ही निवडणूक अतिशय गंभीरपणे घेऊन ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थतीत पारदर्शक वातावरणात पार पाडायची आहे. तसेच आपणासाठी कोरोनासह नैसर्गिक म्हणजेच अवकाळी पावसाचा असा अवघड काळ आपल्या जिल्हयाने पार पाडलेला आहे. त्यामुळे निवडणूकीचे हे काम देखील सर्वांनी निर्विघ्नपणे पार पाडावे अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना डॉ.प्रताप काळे म्हणाले की, मतदान केंद्रस्थळी जाण्यापूर्वी आवश्यक असलेले सर्व साहित्य घेताना मतपत्रिका, मतदार यादी, पेन यासह आवश्यक असलेले सर्व साहित्य व्यवस्थित आहे किंवा नाही ? हे पहावे. तसेच केंद्र अध्यक्ष हा मतदान केंद्राचा प्रमुख असल्यामूळे सर्व सहका-र्याना सोबत घेऊन केंद्रस्थळी मुक्कामी राहाणे बंधनकारक आहे. कोणत्याही अधिका-याने एकही चुक केल्यास ती खपवून घेतली जाणार नसून मतदान केंद्र परीसरात पोलिसांना मतदान सुरू असताना कुठल्याही प्रकारच्या बातम्या वाचण्यासाठी दैनिक पेपर वापरण्यास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे सांगुन ते म्हणाले की, मतदान अधिका-यांनी डायरी लिहीताना वेळच्यावेळी प्रत्येक घटनेचा डायरीमध्ये स्पष्टपणे उल्लेख करणे महत्वाचे असून डायरी हीच मतदान केंद्राचा आरसा आहे असेही त्यांनी नमूद केले. यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकी संदर्भात तयार करण्यात आलेल्या व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून आदर्श मतदान केंद्राची रचना कशी असावी, मतदान पेटी कशाप्रकारे सील करावी व इतर अनुषंगिक माहिती देण्यात आली.

सुत्रसंचालन नायब तहसिलदार चेतन पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार पंकज मंदाडे यांनी मानले. मतदार संघाच्या अनुषंगाने पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर असलेल्या ८ मतदान केंद्राध्यक्ष व १० मतदान अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येऊन पुढील कारवाई होणार आहे. यापुढील कोणत्याही प्रशिक्षणास संबंधित अधिका-यांनी अनुपस्थित राहू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

कोविड योद्ध्यांना सेवेत पूर्णपणे सामावून घ्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या