उस्मानाबाद : प्रतिनिधी
तालुक्यातील वाघोली येथे एका व्यक्तीच्या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने 16 लाख 50 हजार रूपये घेतले. मात्र, बांधकाम पूर्ण न करताच कंत्राटदार फरार झाला. याप्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे बब्रुवान नारायण पाटील यांचा प्लॉट आहे. या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी कवठे महांकाळ (जि. सांगली) येथील कंत्राटदार परशुराम श्रीमंत खोत यांना कंत्राट दिले होते. त्यापोटी पाटील यांनी खोत यांना उस्मानाबाद कोर्टात करारनामा करून बांधकामापोटी 24 लाख 92 हजार 448 रूपये देण्याचे ठरले होते.
यासाठी 7 फेब्रुवारी 2022 ते ऑगस्ट महिन्यापर्यंत परशुराम खोत यांना बब्रुवान पाटील यांच्या मुलांने त्यांच्या बँक खात्यावरून 16 लाख 50 हजार रूपये ऑनलाईन दिले. असे असतानाही परशुराम खोत यांनी बांदकाम पूर्ण न करता परस्पर पसार होऊन बब्रुवान यांची फसवणूक केली. याप्रकरणी बब्रुवान पाटील यांनी 6 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून परशुराम खोत याच्या विरूद्ध भादंसं कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.