33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home उस्मानाबाद गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समाजाला गरज : खा. राजेनिंबाळकर

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समाजाला गरज : खा. राजेनिंबाळकर

एकमत ऑनलाईन

अणदूर : समाजामध्ये चांगल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणा-या शिक्षण संस्थांची समाजाला गरज असून अशा गुणवत्तापूर्ण केंद्रातून ग्रामीण भागातील चांगले अधिकारी घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सुसंस्कृत समाजात निर्माण झालेले अधिकारी हे अधिक सक्षमपणे कार्य करू शकतात, त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले.

श्री श्री गुरुकुल मधील दहावीच्या परीक्षेत केंद्रात प्रथम आलेली रचना काळे व द्वितीय प्रेरणा बनसोडे यांच्यासह २३ विद्याथ्र्यांनी घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्याथ्र्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प सदस्य बाबुराव चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कैलास पाटील, जगन्नाथ गवळी, दिपक आलूरे, बाळकृष्ण घोडके-पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे यांची उपस्थिती होती. कमी गुण मिळाले म्हणून खचून न जाता जिद्दीने पुढील तयारीला लागलो, दहावी-बारावी कमी गुण असलेले अनेक विद्यार्थी पुढील काळात यशस्वी अधिकारी झाले आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात चांगल्या मार्गदर्शन शिबिरे घेण्याचा मानस यावेळी बोलताना खा. राजेनिंबाळकर यांनी वक्त केला.

यावेळी गावातील कोरोना काळात कार्य कार्यकरणा-या माजी सभापती बालाजी मोकाशे, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण, तलाठी विलास कोल्हे,पोलीस पाटील जावेद शेख या कोविड योद्धयांचा सत्कार संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज भुजबळ यांनी व प्रास्तविक संतोष मोकाशे यांनी तर आभार मुख्याध्यापक लक्ष्मण नरे यांनी मानले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. नागनाथ कुंभार, प्रशांत मिटकर, डॉ. विवेक बिराजदार, दयानंद मुडके यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

बीड: मराठा समन्वयक समितीकडून राज्यभर आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या