उस्मानाबाद : औरंगाबाद येथे राज्याच्या कानाकोर्पया येर्णाया शेकडो खेळाडूंच्या ऊर्जेचा स्त्रोत असलेली मशाल बुधवारी दि. 30 नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातून पेटवून मशाल रॅलीस प्रारंभ करण्यात आला. खेळाडु, क्रीडाप्रेमींच्या प्रचंड उत्साहात सुरु झालेली ही रॅली चार जिल्हयातून औरंगाबाद येथे पोहचणार आहे. औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होर्णाया राज्य क्रीडा महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर तुळजापूर ते औरंगाबाद मशाल रॅली क्रीडा ज्योतचे आयोजन करण्यात आले आहे,
कुलगरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या गार्भायातून क्रीडा महोत्सवाची ज्योत प्रज्वलित करून रॅलीस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. मनेर, डॉ. संजय कोरेकर, प्राचार्य डॉ. शित्रे, तुळजापूर मंदिराचे विश्वस्त, तहसीलदार, उस्मानाबाद येथील मशाल रॅलीचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. चंद्रजीत जाधव, डॉ. भेलंिसंग जाधव, डॉ. समीर बावीकर, डॉ. कपिल सोनटक्के डॉ. आप्पा सोनकाटे, डॉ. विलास राठोड, डॉ. अशोक कांबळे, मशाल रॅलीचे समन्वयक डॉ. संदीप जगताप, डॉ. पांडुरंग रणमाळ, डॉ. भुजंग डावकर, गणेश जाधव, कृष्णा फले, जावेद शेख आदींसह विविध महाविद्यालयातील खेळाडू व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मशाल रॅलीमध्ये शहरातील विविध मान्यवर, अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडू सारिका काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरवाले, क्रीडा अधिकारी कैलास लटके, उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, नगरसेविका प्रेमाताई पाटील, प्रवीण बागल, दत्तात्रय जावळे, डॉ. अंिजक्य रेनके, शिवकुमार स्वामी सहभागी झाले होते.