उमरगा : उमरगा शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गात दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. सोमवारी रात्री आलेल्या अहवालात २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, दुसèयाच दिवशी मंगळवारी धक्कादायक आकडा समोर आला. तब्बल ४६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उमरगा शहरासह तालुक्यातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे . उमरगा शहरातील तब्बल ३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत . उमरगा नगरपालिकेतील सफाई कामगारांचा समावेश आहे .
शहरातील व्यापारी, हॉटेल मालक व कामगारांचा समावेश आहे. जुनी पेठ येथील तीन, मुळज रोड एक, पतंगे रोड पाच, साने गुरुजी नगर दोन, एकोंडी रोड दोन, शिवाजी चौक दोन, भाजी मार्केट एक, आरोग्यनगर एक, गॅस एजन्सी एक, शिवपूरी कॉलनी एक, सदननगर एक, बालाजी नगर एक, सोनार गल्ली एक, रामनगर एक, इंदिरा चौक एक, अजयनगर एक, पटेल स्वीट मार्ट एक, तुरोरी एक, जकेकूर चौरस्ता एक, जकेकुर एक, मुरुम दोन, कंटेकूर एक, मुळज एक व दाबका इत्यादीचा समावेश आहे.
दरम्यान सोमवारी घेतलेल्या १८७ स्वब पैकी ४६ पॉझीटिव्ह आले आहेत . जवळपास ४२ अहवाल अजून पेंडिंग आहेत.सर्व पॉझिटीव्ह रुग्णाना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग उमरगा शहरात वाढल्याने रुग्ण संख्येत कमालीची वाढ झाली आहे . रुग्ण संख्या दोनशे पार आकडा पार केला आहे. मंगळवारी रात्री आलेल्या ४६ पॉझिटिव्ह रुग्णसंख्येची त्यात भर पडून महिनाभरातील रुग्णांची संख्या २३१ झाली आहे. तर ११० जणाना डिस्चार्ज मिळाला आहे तर आत्तापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन होत नसल्याने गंभीर परिस्थिती होत आहे.
Read More सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची -अंकिता लोखंडे