21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeउस्मानाबादपिंपळा खुर्द येथील स्वस्तधान्य दुकानाची पथकाकडून तपासणी

पिंपळा खुर्द येथील स्वस्तधान्य दुकानाची पथकाकडून तपासणी

एकमत ऑनलाईन

काटी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळाखुर्द येथील स्वस्तधान्य दुकानातील भ्रष्टाचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २० नोव्हेंबर रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार पथकाकडून तपासणी करण्यात आली. येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे श्रीमती मस्के दुकानदार यांच्यासमक्ष शिधापत्रिकाधारकांचे जबाब घेऊन चौकशी केली. या चौकशी दरम्यान तब्बल २१७ शिधापत्रिकाधारकांनी आपले जबाब नोंदवले. सर्व जबाबांचा सरासरी विचार केल्यास नियमाप्रमाणे धान्य वाटप होत नसल्याचा रोष ग्रामस्थांमधून दिसून येत होता. सदर जबाबांची ऑनलाईन वाटप पोर्टलवर तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येईल, असे पथक प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येथील दुकानामधून नागरीकांना धान्य व्यवस्थित मिळत नसल्याने व दुकानचालक हा मनमानी कारभार करुन भ्रष्टाचार करत असल्याचे ग्रामस्थ व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी उघडकीस आणले. अन्न पुरवठा मंत्री व जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन चौकशी करण्यात आली या चौकशीमध्ये सदरील दुकानामध्ये धान्य वाटपात तफावत आढळून आल्याने सदरील दुकानाचा परवाना रद्द करून अभिलेखे जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु पुन्हा दुकान श्रीमती मस्के यांच्याकडे गेल्याने स्वस्त धान्य दुकानावर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला. यावरही तोडगा काढला परंतु पुन्हा दुस-यांदा ऐन दिवाळीत ५० ते ५५ नागरीकांना धान्यापासून वंचित राहावे लागले.

शंकर कदम, धन्यकुमार डांगे व इतर ग्रामस्थांनी पुन्हा तक्रार केल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दुस-यांदा तपासणी पथकाची नेमणूक करुन दि.२० नोव्हेंबर रोजी पिंपळा खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे श्रीमती मस्के दुकानदार यांच्यासमक्ष शिधापत्रिका धारकांचे जबाब घेऊन चौकशी करण्यात आली.या चौकशी दरम्यान तब्बल २१७ शिधापत्रिका धारकांनी आपले जबाब नोंदवले.सर्व जबाबांचा सरासरी विचार केल्यास नियमाप्रमाणे धान्य वाटप होत नसल्याचा रोष ग्रामस्थांमधुन दिसून येत होता.सदर जबाबांची ऑनलाईन वाटप पोर्टलवर तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ तहसीलदार याच्याकडे सादर करण्यात येईल असे पथक प्रमुख यानी बोलताना सांगितले. या चौकशी करीता संदीप जाधव, जी. एस. पवार, तलाठी ए.बी.सुरवसे, कोतवाल उपस्थित होते तर पंचनाम्यावर बालाजी पाटील, शंकर कदम, धनाजी डांगे, महादेव भोळे, यशवंत पारधे, नागनाथ कदम या पंचाच्या स्वाक्षरी आहेत.

आघाडीचं सरकार आलं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते – नारायण राणे यांचा दावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या