32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeउस्मानाबादअणदूरमध्ये बलात्कार घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

अणदूरमध्ये बलात्कार घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तालुक्यातील अणदूर येथे बुधवारी (दि.२७) नववी वर्गात शिकत असलेल्या मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती. यातील नराधमांना कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी नागरिकांनी रविवारी (दि.३१) या घटनेच्या निषेधार्थ गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच निषेध रॅली काढण्यात आली.

या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून रविवारी गाव बंद ठेवून गावातून रॅली काढून निषेध सभा घेण्यात आली. गावातील बाजार मैदानावर सभा घेत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी दीपक आलुरे, साहेबराव घुगे, माणिक आलूरे, दीपक घोडके, सिद्रामप्पा नरे, अरविंद घोडके, बसवराज नरे, राजेश देवसिंगकर आदींनी आपल्या भावना व्यक्त करताना तिन्ही आरोपींना तात्काळ कारवाई व्हावी, फरारी असलेल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांनी नियुक्ती करावी व खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा आदी मागण्या मांडल्या. फरार आरोपी तात्काळ अटक करावी अन्यथा २ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे उपोषणाला बसणार असल्याचे पोलीस निरीक्षक नळदुर्ग यांना एक निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.

यावेळी घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याने गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. गावात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून गावक-यांनी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला.

शंकर नागरी बँक घोटाळा; पंधरावा आरोपी ताब्यात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या