22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत स्वतंत्र विद्यापीठासाठी जोरदार निदर्शने

उस्मानाबादेत स्वतंत्र विद्यापीठासाठी जोरदार निदर्शने

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : स्वतंत्र विद्यापीठावरुन शुक्रवारी दि.२७ मे औरंगाबाद येथे सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. याचे तीव्र पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात उमटले. शुक्रवारी रात्री व शनिवारी (दि.२८) उस्मानाबाद शहरात सर्वच पक्ष, विविध संघटना यांनी एकत्र येत घटनेचा निषेध नोंदवला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयास पुष्पहार अर्पण करुन काळया फिती लावून निदर्शने करण्यात आली.

औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद येथे उपकेंद्र आहे. सध्या उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रुपांतर व्हावे, अशी अपेक्षा उस्मानाबाद जिल्हावासीयांची आहे. त्यासाठी सिनेट सदस्य संजय न्ािंबाळकर हे प्रयत्नशील होते. त्यानिमित्त निंबाळकर हे बैठकीसाठी औरंगाबाद येथे विद्यापीठात गेले होते. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेची बैठक संपल्यानंतर सभागृहाबाहेरच रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली.

या घटनचा उस्मानाबाद जिल्हाभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (दि.२८) सर्वपक्षीयांच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील,ऍड. मिल्ािंद पाटील, संजय पाटील दुधगावकर, मसुद शेख, व्यापारी संघटनेचे संजय मंत्री, पत्रकार संघाचे धनंजय रणदिवे, वकील संघाचे ऍड. देशमुख, बामुक्टो संघटनेचे प्रा. संजय कांबळे, अमित श्ािंदे, प्रा. नितीन पडवळ, आदित्य गोरे, शिवसेनेचे सतीश सोमाणी, ऍड. संजय भोरे, प्रविण कोकाटे, बापू साळुंके, काँग्रेसचे आशिष मोदाणी, अग्निवेश श्ािंदे, प्रशांत पाटील, जावेद काझी, ऍड विश्वजीत श्ािंदे, अय्याज शेख, इस्माईल शेख, असद शेख, वाजीद पठाण, बिलाल तांबोळी, रोहित पडवळ, पप्पु मुंडे, सोमनाथ गुरव, भिमा जाधव, ऍड.खंडेराव चौरे, लक्ष्मण माने, ऍड.विशाल साखरे, सुनिल काकडे, ओम नाईकवाडी, प्रविण पाठक, इंद्रजित देवकते, प्रसाद मुंडे, हिम्मत भोसले, विशाल पाटील, नंदकुमार गवारे, महेश पडवळ, आकाश माने, सचिन तावडे, मृत्यूंजय बनसोडे, अनिकेत पाटील, ओंकार नायगावकर, रोहित बागल, रणवीर इंगळे, राजाभाऊ बागल, सागर मोरे, मीनल काकडे, रवि कोरे, महेश गरड, गोपाळ देशमुख, डॉ.अतुल हुंबे, प्रा. महेश माने, प्रा. संतोष काळे, अजयकुमार माळी, राहुल गवळी, कुणाल निंबाळकर, अमित निंबाळकर, प्रविण न्ािंबाळकर, आनंद न्ािंबाळकर, मंगेश न्ािंबाळकर, आनंद भोसले, मनोज मुदगल, अमित माने, ऍड. अतुल देशमुख आदी विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या