Tuesday, October 3, 2023

स्वतंत्र अभियंता संशोधनाचा विषय

धनंजय पाटील उस्मानाबाद : जिल्ह्यात हायब्रीड अ‍ॅन्युईटी प्रकल्पांतर्गत उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्यातील रस्त्याचे पेव्हड् शोल्डर्ससह दुपदरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम बसवराज मंगरुळे यांच्या उस्मानाबाद-बीड-लातूर-ए यू-१ स्टेट वे प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहे. या रस्ता कामावर स्वतंत्र अभियंता म्हणून तीन कंपनीला काम देण्यात आले असून त्यातील श्रीखंडे असोसिएट्स या कंपनीला उस्मानाबाद-बेंबळी-नांदूर्गा या रस्त्याचे ५ नोव्हेंबर २०१९ ला काम देण्यात आले आहे. तसेच थ्रोट्स कन्सलटंट प्रा. लि. ही असून यांच्याकडे बीड-निलंगा व लातूर-कळंब ही कामे आहेत. यांचीही नेमणूक नोव्हेंबर २०१९ त्याच प्रमाणे फोर्टीज कन्स्टटंट लि. या कंपनीकडे परळी-आंबेजोगाई-बर्दापूर या रस्त्याचे काम आहे.

तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात हायब्रीड अ‍ॅन्युईटी प्रकल्पांतर्गत राज्य मार्ग २३८ उस्मानाबाद-बेंबळी-नांदुर्गा व उस्मानाबाद शहर वळण रस्ता असे ३७.२०० किलोमीटरच्या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. तर कळंब तालुक्यात कळंब-लातूर या ६० किलोमीटर रस्त्याचे काम आहे. यातील उस्मानाबाद-बेंबळी-नांदुर्गा रस्ता कामासाठी श्रीखंडे असोसिएट्स ही कंपनी काम पाहत आहे. त्यासाठी टीम लिडर म्हणून एम. एम. खान, रेसिडेन्ट इंजिनीअर म्हणून एस. एल. शेलगावकर, मटेरियल इंजिनिअर म्हणून एस. आय. मुल्ला व साईट इंजिनिअर म्हणून नितीन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच थ्रोट्स कन्सलटंट प्रा. लि. यांच्याकडे बीड-पाथर्डी-निलंगा-तोग्री व कळंब-लातूर या रस्त्याचे काम आहे.

या कामावर त्रिलोक शर्मा राजस्थान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामावर सहा साईट इंजिनिअर्स व तीन ऑफिस इंजिनिअर असून यांचे लातूर येथे कार्यालय आहे. तसेच फोर्टीज या कंपनीकडे परळी-आंबेजोगाई-बर्दापूर या रस्त्याचे काम आहे. सदर रस्त्यावर साईड कामासाठी ९ व कार्यालयीन कामकाजासाठी ६ अशा एकूण १५ लोकांचा स्टाफ असल्याची माहिती रुपेश करंजीकर यांनी दिली. सदर तीन्ही कंपनीस अनुक्रमे श्रीखंडे असोसिएट्स यास ६५ लाख, फोर्टीज यास ६८ लाख तर थ्रोट्स कन्सलटंट सव्वादोन कोटीच्या आसपास असल्याचे माहिती त्रिलोक शर्मा यांनी दिली.

या तीनही कंपन्यांनी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता अशा अधिका-यांची नियुक्ती केली आहे. जवळपास या पदावरील अंदाजे ३० कर्मचारी २४ महिन्यासाठी कार्यरत असून प्रति कर्मचाèयास किमान महिना ४० ते ५० हजार पगार धरल्यास महिन्याकाठी १२ ते १५ लाख रुपये तर २४ महिन्याचे अडीच ते तीन कोटीच्या आसपास कर्मचाèयांच्या पगाराचे होतात. तसेच कार्यालयीन भाडे साईडवर जाण्या-येण्यासाठी लागणारे वाहन व इंधन हा खर्च कोट्यवधीच्या घरात असून सदर तीन्ही कंपन्यांनी ०.६ टक्क्याने निविदा भरली आहे.

एवढ्या कमी पैशात हे कर्मचारी काय सुविधा देणार? असा यक्ष प्रश्न पडला आहे. सदर कामाचे मोजमाप करण्याची जबाबदारी या कंपन्यांची आहे. परंतू सदर कंपनीतील कर्मचारी हे ठेकेदाराच्या मदतीने व ठेकेदाराच्या यंत्रणेने काम करत असून ठेकेदार म्हणेल त्या पध्दतीने बील रेकॉर्ड ठेक़ेदार व संबंधित कंपनीचे अधिकारी यांच्या संगणमताने बील रेकॉर्ड करुन कोट्यवधी रुपयाचे बिले उचलली जात आहेत. या तीन्ही कंपन्याच्या कामाची व कर्मचा-यांची वरिष्ठ पातळीवरुन सार्वजिनक बांधकाम मंत्री व मुख्य सचिव यांच्याकडून चौकशी केल्यास यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येईल. ( क्रमश:)

Read More  चीनी कंपन्यांनी दिलाय फंड; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या