23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeउस्मानाबादभूम तालुक्यातील हिवर्डा येथे विवाहितेची आत्महत्या

भूम तालुक्यातील हिवर्डा येथे विवाहितेची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : सासरकडील लोकांच्या त्रासाला कंटाळून भूम तालुक्यातील हिवर्डा येथील विवाहित महिलेने विष पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना ११ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी सासरच्या पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याने भूम पोलीस ठाण्यात १२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवर्डा येथील अर्चना ऊर्फ रूपाली बिभीषण कांदे (वय २८ वर्षे) यांना सासरचे लोक सतत शिवीगाळ करून मारहाण करीत होते.

त्यामुळे अर्चना यांनी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विष पिवून आत्महत्या केली. या प्रकरणी रविंद्र पवार रा. भोयंजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिभीषण कांदे, सुमन कांदे, शांतीलाल मुंडे, अर्जुन मुंडे, तानाजी मुंडे यांच्या विरोधात भूम पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या