22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeउस्मानाबादअनसुर्डा येथे सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अनसुर्डा येथे सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : सासरच्या लोकांनी केलेल्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अनसुर्डा ता. उस्मानाबाद येथे २६ जून रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह ७ जणांच्या विरोधात बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, अनसुर्डा ता. उस्मानाबाद येथील विवाहिता मेघा चंद्रकांत माने, (वय ३१) वर्षे ह्या माहेरहुन पैसे आणत नसल्याच्या कारणावरुन सासरच्या लोकांनी मेघा यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच मेघा यांचे पती चंद्रकांत माने हे मेघा यांना मारहाण करुन त्यांच्याजवळील शिवणकाम करुन कमावलेले पैसे घेत असत. या छळास कंटाळून मेघा यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

या प्रकरणी मयत विवाहिता मेघा यांचे भाऊ अंकुश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती चंद्रकांत भुजंग माने, जिजाबाई माने, भुजंग माने, तीघे रा. अनसुर्डा, कोमल पडवळ, धनश्री, सिमा मुळे, राजाबाई, या ७ जणांच्या विरोधात बेंबळी पोलिस ठाण्यात २७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या