29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeउस्मानाबादफत्तेपूर येथे विवाहितेची आत्महत्या, सासूवर गुन्हा

फत्तेपूर येथे विवाहितेची आत्महत्या, सासूवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

धाराशिव : प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील फत्तेपूर येथील एका २५ वर्षीय विवाहितेने सासूच्या मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सासूच्या विरोधात १६ मार्च रोजी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फत्तेपुर ता. लोहारा येथील रविना वैजिनाथ भिसे वय २५ वर्षे, यांनी दि.२७ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली.

रविना भिसे यांची सासू छायाबाई संभाजी भिसे यांनी वेळोवेळी दिलेल्या शारिरीक व मानसिक जाचास व त्रासास कंटाळून रविना यांनी आत्महत्या केली, अशी फिर्याद मयताची आई कविता रामदास बनसोडे, रा. धनलक्ष्मी नगर, गोंधळी वस्ती, उत्तर सोलापूर यांनी दि.१६ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम अंतर्गत लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या