34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home उस्मानाबाद कृषी धोरणास स्थगिती; राज्य शासनाच्या आदेशाची भाजपाकडून होळी

कृषी धोरणास स्थगिती; राज्य शासनाच्या आदेशाची भाजपाकडून होळी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शेतक-यांच्या हिताच्या केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकला राज्य शासनाने दिलेल्या स्थगिती आदेशाची उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा किसान मोर्चाच्या वतीने होळी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, किसान मोर्चा मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, जिल्हा सरचिटणीस (संघटन) अ‍ॅड. नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा माधुरीताई गरड, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष राहुल काकडे, तानाजी पाटील, योगेश जाधव, पूजा राठोड, आशाताई लांडगे, महेश चांदणे, प्रवीण पाठक, नामदेव नायकल, भास्कर बोंदर, दाजीआप्पा पवार, ओम नाईकवाडी, गिरीश पानसरे, गणेश मोरे, अमोल पेठे, कुलदीप भोसले, सुजित ओव्हाळ, सुनील पंगुडवाले, मनोजसिंह ठाकुर, गजानन नलावडे, बालाजी जाधव, रमेश रोकडे, अजय यादव, बबलू शेख, रवी सूर्यवंशी, दादुस गुंड, शंकर मोरे, राजेंद्र शिंदे, चिंटू पाटील, निरंजन जगदाळे, ओमकार वायकर आदी उपस्थित होते.

भूम येथे होळी करुन मुख्यमंत्र्याना निवेदन
येथे परिपत्रकाची होळी करून निषेध करण्यात आला. व निवेदन तहसिल मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस आदम शेख, तालुकाध्यक्ष महादेव, भ.विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष सिताराम वणवे, जनसेवा बँक चेअरमन श्रीराम मुळे, शहराध्यक्ष संतोष सुपेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब कुटे, शंकर खामकर, सुजित वेदपाठक, लक्ष्मण भोरे, माजी नगराध्यक्ष संभाजी साठे, पुरुषोत्तम देशमुख. महिला आघाडी तालुकाध्यक्षा लताताई गोरे आदी उपस्थित होते.

कळंब येथे तहसिल कार्यालयासमोर होळी
येथे राज्य शासनाच्या या आदेशाची तहसील कार्यालयासमोर भा.ज.प.चे वतीने होळी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, नानासाहेब यादव, रामहरी qशदे, अरुण चौधरी, मिनाज शेख, तात्या थोरबोले, सुरेश कोरे, अनिल टेकाळे, भगवानराव ओव्हाळ, राहुल चव्हाण, दिलीप पाटील, अण्णा राखुंडे, संजय जाधवर, माणिक बोंदर, संदीप बाविकर, प्रदीप फरताडे, जीवा कुचेकर, प्रशांत लोमटे, हरिभाऊ शिंदे, सतीश शिंदे, व्यंकट शेळके, बाळासाहेब पवार, इम्रान मुल्ला, राजा टोपे आदी उपस्थित होते.

वाशी येथे राज्य सरकारविराधोत घोषणाबाजी करुन होळी
येथे कृषी विधेयक स्थगिती आदेशाची होळी करुन राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे, भाजपा नेते अशोकराव जाधव, तालुका सरचिटणीस राजगुरू कुकडे, विजय तळेकर, सुहास चौघुले, संदीपान घोडके, संतोष गादेकर, लाखणगावचे चव्हाण गुरुजी, काशिनाथ गव्हाणे व भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

उमरगा येथे राष्ट्रीय महामार्गावर आदेशाची होळी
केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकाला महाराष्ट्र सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ घोषणा बाजी करीत तालुका भाजपा वतीने राष्ट्रीय महामार्गावर स्थगिती अध्यादेशाची होळी करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अभय चालुक्य, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, जिपचे समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, तालुका उपाध्यक्ष अनिल बिराजदार, महादेव सलके, बालाजी कोराळे, आकाश जाधवर आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

लोहारा येथे होळी करुन तहसिदारांना निवेदन
येथे केंद्र सरकारने शेतक-यांच्या हितासाठी कृषी सुधारणा विधेयक पारीत केला, परंतु विधेयकाला महाराष्ट्र सरकारने स्थगिती आदेश दिल्याने भाजपा लोहारा तालुका यांच्या वतीने या स्थगिती आदेशाची होळी करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तथा नगरसेवीका आरती सतिश गिरी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, इकबाल मुल्ला, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, जिल्हा कार्यकारणी सदस्य कमलाकर सिरसाठ, गणेश जवादे, विकी मोरे, अंकुश बंडगर, बाबुराव घाडगे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या