33.1 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home उस्मानाबाद नरेंद्र आर्य गौण खनिज प्रकरणी दोषीवर कारवाई करा

नरेंद्र आर्य गौण खनिज प्रकरणी दोषीवर कारवाई करा

एकमत ऑनलाईन

तुळजापूर (ज्ञानेश्वर गवळी): तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळ पदाधिकारी, गुत्तेदार प्रमोद ब्रह्मानंद मोरे व तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले यांनी ११ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तुळजापूर तालुक्यातील नरेंद्र आर्य विद्यालयाच्या खाजगी मालमत्तेतून गौण खनिज उत्खनन प्रकरणे नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेवर व गुत्तेदार प्रमोद ब्रमानंद मोरे आणि तुळजापूर येथील तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना देण्यात आले होते. त्या अनुशंगाने गौण खनिज उत्खनन प्रकरणी नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळ व गुत्तेदार प्रमोद ब्रह्मानंद मोरे व तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यावर कारवाई करण्याबाबत रूपाली आवले यांनी हे आदेश उपविभागीय अधिकारी यांना आदेश काढले आहेत.

नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची मालमत्ता जमीन गट नंबर ४५९, ४६०, ४६१ एकूण क्षेत्र २२९ एकर दानपत्राआधारे राजा गोविंदराव जागीरदार यांनी संस्थेस दिले होते. त्यांचा उद्देश हा या भागात शिक्षण वाढीस तसेच साक्षरता वाढवणे होता. तसेच गावातील व परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, प्रत्येक घटकास रोजगार मिळावा. अशा उद्देशातून हे दानपत्र केले होते. मात्र १८ मे २०२० रोजी संस्थेतील विश्वस्त विजयकुमार हरिभाऊ भोसले सचिव तसेच मुख्याध्यापक मारुती गणपत जाधव व सर्व विश्वस्त यांनी संगनमताने या जमिनीतील माती उत्खनन करून दत्ता कंट्रक्शन सोलापूर येथील गुत्तेदार प्रमोद ब्रमानंद मोरे (रा. संगमनेर ता. बार्शी) यांना कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता qकवा धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता विक्री केली आहे. सदर गौण खनिज अंदाजित २० कोटी रुपये एवढे आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने आरोप केला होता.

अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशामुळे नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेवरील पदाधिकारी, गुत्तेदार प्रमोद ब्रमानंद मोरे आणि तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे अपसिंगा येथील नागरिकांसह सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले असून चर्चेला उधान आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ग्रामीण व्यक्तींना चाचणी करण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या